India Vs Pakistan: भारत- पाकिस्तान भिडणार; ‘या’ दिवशी होणार हाय व्होल्टेज सामना

103

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. (T-20 world Cup) या वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कपमध्ये ही लढत होणार आहे. 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी रविवारी भारत- पाकिस्तानमध्ये लढत होईल. आशिया चषक टी-20 फाॅर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. भारत -पाकिस्तान संघ 2021 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदा आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने आमने -सामने येतील.

भारत पाकिस्तानमधील शेवटचा सामना मागील वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यादृष्टीने आशिया कप स्पर्धा महत्त्वाची आहे.

( हेही वाचा: Happy Birthday MS Dhoni : धोनीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे ‘५ रेकाॅर्ड्स’ )

पात्रता फेरीनंतर विजेत्या संघाला खेळण्याची संधी 

आशिया कप स्पर्धेत यजमान श्रीलंका संघासह भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशने आपले स्थान पक्के केले आहे. तर, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, ओमान, हाॅंगकाॅंग आणि इतर संघात पात्रता फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. या पात्रता फेरीतील विजेत्या संघाला आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.