Ind-vs-Pak-Asia-Cup-2023 च्या सुपर-4 टप्प्यातील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. पावसामुळे सामना थांबला आहे. सध्या पाऊस थांबला असून कव्हर्स हटवले जात आहेत.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 13 षटकात विनाबाद 96 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानेही हिटमॅनची खेळी करत 42 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सतराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितला शादाब खानने फहीम अश्रफच्या हाती झेलबाद केले. रोहित 56 धावांवर बाद झाला. तर त्यापाठोपाठ शुभमन गिल देखील बाद झाला झाला. शाहिन आफ्रिदीने त्याची विकेट घेतली.
टीम इंडिया 2 बदलांसह मैदानात
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद शमीच्या जागी जसप्रीत बुमराहला खेळवण्यात आले आहे. नाणेफेकनंतर रोहित म्हणाला- ‘आम्हाला नाणेफेक जिंकून फलंदाजी करायची होती. सर्व सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
भारत-पाकिस्तान सुपर-4 सामन्याचे स्कोअरकार्ड
दोन्ही संघांचे प्लेइंग-11…
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रऊफ.
सध्या कोलंबोमध्ये सकाळपासूनच ऊन आहे. याआधीच्या हवामान अंदाजानुसार आज येथे ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
पाकिस्तानने आपल्या पहिल्या सुपर-4 सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला होता. त्याचबरोबर टीम इंडियाचा हा पहिला सुपर-4 सामना असेल. आशिया चषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले मैदानावर खेळलेला तो सामना पावसामुळे रद्द झाला होता.
हेड टू हेड
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 133 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 55 सामने जिंकले असून पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये दोघांमध्ये 14 सामने खेळले गेले. भारताने 7 आणि पाकिस्तानने 5 जिंकले, तर 2 सामनेही अनिर्णित राहिले.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर वनडेमध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी 2005 मध्ये आशिया चषक स्पर्धेत हे दोघे आमनेसामने आले होते, त्यावेळी पाकिस्तानने 59 धावांनी विजय मिळवला होता.
Join Our WhatsApp Community