T-20 विश्वचषकातील भारत – पाकिस्तान सामना होणार नाही? ‘हे’ आहे कारण

145

टी- 20 विश्वचषकात 23 ऑक्टोबर रोजी रविवारी कडवे प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा महामुकाबला पाहण्यासाठी एक लाख प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जग या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, या थरारक सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे कोट्यवधी चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.

23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये 95 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एखादा सामना खेळण्यासाठी किमान 5 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, साखळी सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेले नाहीत. परंतु, उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस आहेत.

( हेही वाचा: उद्धव ठाकरे, तुमच्या संपत्तीचा हिशोब द्या…; उच्च न्यायालयात याचिका )

सामन्याच्या दिवशी 95 टक्के पाऊस

अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना हवामानानुसार रणनीती बनवावी लागेल. अशा परिस्थितीत खेळपट्टी आणि मैदानाची स्थिती बदलेल. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नाही परंतु मेलबर्नमधील गुरुवारी रात्री रिमझिम पाऊस पडू शकतो. मात्र, पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव अधिक दिसून येईल. 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची 96 टक्के शक्यता आहे. तर 26 ऑक्टोबर रोजीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.