- ऋजुता लुकतुके
जेमतेम पाच सत्र चाललेली केपटाऊन कसोटी क्रिकेटमधील नकोशा विक्रमाच्या पानावर कोरली गेली आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्धची दुसरी केपटाऊन कसोटी भारतीय संघाने ६ गडी राखून जिंकली. पण, यात मजेची गोष्ट ही की, दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन डाव दीड दिवसांतच आटोपले. आणि त्यामुळे ही केपटाऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात छोटी म्हणजे कमी काळ चाललेली कसोटी ठरली आहे. दुसऱ्या दिवशी जेवणाच्या विश्रांतीनंतर १२ षटकांत ही कसोटी संपली. म्हणजे एकूण साडेचार सत्र.
भारताने (१५३ व ३ बाद ८०) दक्षिण आफ्रिकेचा (५५ व १७४) पराभव करत मालिकेत तर १-१ अशी बरोबरी साधलीच. शिवाय सव्वा दिवसांत कसोटी जिंकण्याचा पराक्रमही केला.
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खासकरून आशियाई देश आणि एकूणच परदेशी संघांसाठी आव्हानात्मक मानली जाते. तिथल्या खेळपट्टीवरील कमी-जास्त उसळणारा चेंडू हे त्याचं मुख्य कारण आहे. अशावेळी भारतीय संघ केपटाऊनमध्ये कसोटी जिंकलेला पहिला आशियाई देश ठरला आहे.
(हेही वाचा – India vs SA 2nd Test : भारत पुन्हा एकदा कसोटीत ‘अव्वल’)
𝘼 𝙘𝙧𝙖𝙘𝙠𝙚𝙧 𝙤𝙛 𝙖 𝙬𝙞𝙣! ⚡️ ⚡️#TeamIndia beat South Africa by 7⃣ wickets in the second #SAvIND Test to register their first Test win at Newlands, Cape Town. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE pic.twitter.com/vSMQadKxu8
— BCCI (@BCCI) January 4, 2024
ही केपटाऊन कसोटी ६४२ चेंडूंत म्हणजे १०७ षटकांत संपली. आणि या निकषावरही ही सगळ्यात छोटी कसोटी आहे. या आधीची सगळ्यात छोटी कसोटी होती ती १९३२ साली द आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्नला झालेली कसोटी. त्या कसोटीत १०९ षटकं टाकली गेली होती. भारतीय संघाने खेळलेली आणि दोन दिवसांच्या आत संपलेली ही तिसरी कसोटी आहे. यापूर्वी भारताने अफगाणिस्तानचा बंगळुरूमध्ये २०१८ च्या कसोटीत झटपट पराभव केला होता. तर २०२१ मध्ये अहमदाबाद कसोटीत भारताचा इंग्लंडकडून दोन दिवसांत पराभव झाला होता.
चेंडू आणि षटकांच्या निकषावर कमीत कमी वेळेत झालेले पहिले पाच पराभव बघूया…
हेही पहा –
Join Our WhatsApp Community