भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. टी-20 मध्ये पाहुण्यांचा सफाया केल्यानंतर, टीम इंडियाची नजर कसोटी मालिका जिंकण्यावर आहे. ही कसोटी मालिका भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आहे. शुक्रवारपासून सुरु होणा-या या कसोटी मालिकेची तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहलीची ही 100 वी कसोटी मालिका असणार आहे. तसेच रोहित शर्माची ही कसोटी कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी असणार आहे. तसेच श्रीलंकेचा हा तिनशेवा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे या कसोटी सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विराट हा भारताचा 12वा खेळाडू
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा शंभरावा कसोटी सामना असणार आहे. 100 कसोटी सामने खेळणारा विराट हा 12वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. त्यांची कारकीर्द आजवर अनेक चढ-उतारांमधून गेली आहे. भारतीय भूमीवर आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या विराटने इंग्लंड दौऱ्यावर संघर्ष केला, पण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत जबरदस्त धावा केल्या. यानंतर त्याने आपले तंत्र बदलले आणि इंग्लंडला जाऊन चमत्कार केला. आता पुन्हा एकदा विराट मोठी इनिंग खेळण्यासाठी संघर्ष करत आहे. नोव्हेंबर 2019 नंतर विराटला एकही शतक झळकावता आले नाही, असे असूनही त्याची सरासरी 40च्या जवळ आहे. दिल्लीचा एक तरुण भारतीय संघात आला आणि पुढच्या 10 वर्षात संपूर्ण जग त्याला किंग कोहली म्हणून ओळखू लागले.
( हेही वाचा :कुपोषित बालकांच्या पैशाने कोण बनले सुृदृढ? )
रोहितची कसोटी लागणार
विराट कोहलीने 6 वर्ष कसोटी कर्णधारपद भूषवले. दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या पराभवानंतर कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा कोहलीने दिला. त्यानंतर कसोटी कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिली कसोटी मालिका असणार आहे. एकदिवसीय आणि टी-20 मध्ये एक यशस्वी कर्णधार असणारा रोहित कसोटी मालिकेतही भारताला यशस्वी वाटचाल घडवेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
श्रीलंकेसाठीही महत्त्वाची मालिका
श्रीलंका आणि भारतामध्ये होणा-या या कसोटी सामन्याचे महत्त्व जितके भारताला आहे. तितकेच ते श्रीलंकेसाठी सुद्धा आहे, कारण ही कसोटी मालिका श्रीलंकेची 300 वी कसोटी मालिका असणार आहे, त्यामुळे या मालिकेचे महत्त्व वाढले आहे.
Join Our WhatsApp Community