100व्या कसोटीत कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘इतक्या’ धावांचा गाठला पल्ला

कोहलीने 100 व्या कसोटी सामन्यात पूर्ण केल्या 8000 धावा

117

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या 100 व्या कसोटी सामन्याच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट भारताचा सहावा खेळाडू आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्यानंतर 100 व्या कसोटीत 8 हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा दुसरा क्रिकेटपटू आहे. रिकी पॉन्टिंगने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी कसोटीत 8 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

… पण विराटची फारशी चमकदार कामगिरी झाली नाही

श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. 100 वी कसोटी खेळणाऱ्या विराटला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. केवळ 45 धावा करुन तो बाद झाला. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर (15921), राहुल द्रविड (13265), सुनील गावस्कर (10122), व्हीव्हीएस लक्ष्मण (8781) आणि वीरेंद्र सेहवाग (8503) हे भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.

विराट हा भारताचा 12 वा खेळाडू

विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा शंभरावा कसोटी सामना आहे. 100 कसोटी सामने खेळणारा विराट हा 12वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. त्यांची कारकीर्द आजवर अनेक चढ-उतारांमधून गेली आहे. भारतीय भूमीवर आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या विराटने इंग्लंड दौऱ्यावर संघर्ष केला, पण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत जबरदस्त धावा केल्या. यानंतर त्याने आपले तंत्र बदलले आणि इंग्लंडला जाऊन चमत्कार केला. आता पुन्हा एकदा विराट मोठी इनिंग खेळण्यासाठी संघर्ष करत आहे. नोव्हेंबर 2019 नंतर विराटला एकही शतक झळकावता आले नाही, असे असूनही त्याची सरासरी 40च्या जवळ आहे. दिल्लीचा एक तरुण भारतीय संघात आला आणि पुढच्या 10 वर्षात संपूर्ण जग त्याला किंग कोहली म्हणून ओळखू लागले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.