India vs SL : श्रीलंका दौऱ्यात हार्दिक व के. एल. राहुल कर्णधार?

132
India vs SL : श्रीलंका दौऱ्यात हार्दिक व के. एल. राहुल कर्णधार?
India vs SL : श्रीलंका दौऱ्यात हार्दिक व के. एल. राहुल कर्णधार?

ऋजुता लुकतुके 

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आगामी श्रीलंका दौऱ्यातूनही दोघं विश्रांती घेतील अशी चिन्हं आहेत. अशावेळी टी-२० संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व के. एल. राहुलकडे (K. L. Rahul) दिलं जाण्याची शक्यता आहे. रोहित चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत कर्णधार राहणार हे बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. पण, त्याचवेळी रोहित आणि विराटनंतर कोण या स्थित्यंतराची तयारीही भारतीय संघाला करायची आहे. (India vs SL)

त्या दृष्टीने पुढील काही दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे चर्चा सुरू असल्याप्रमाणे रोहित (Rohit Sharma) आणि विराटने (Virat Kohli) श्रीलंका दौऱ्यादरम्यान विश्रांती घेतली तर दुसऱ्या फळीतील खेळाडूंची पहिली परीक्षा या मालिकेत होईल. ‘टी-२० क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाचं नेतृत्व करेल हे जवळ जवळ निश्चित आहे. पण, श्रीलंकेच्या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. तिथे पांड्यालाही विश्रांती दिली जाईल,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. (India vs SL)

(हेही वाचा- Nashik Accident : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयावर काळाचा घाला; मालेगावातील हृदयद्रावक घटना)

टी२० विश्वचषकातील विजयात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) महत्त्वाची भूमिका निभावली होती. ८ सामन्यांत त्याने १५३ च्या स्ट्राईकरेटने १४४ धावा केल्या तर ११ बळीही मिळवले. त्याच्या नावावर एक अर्धशतकही होतं. तर अंतिम सामन्यातही त्याने मोक्याच्या क्षणी ३ बळी मिळवले. (India vs SL)

दुसरीकडे के एल राहुलला टी-२० विश्वचषकात संधी मिळाली नाही. पण, ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने मधल्या फळीत दमदार कामगिरी केली होती. ७७ धावांच्या सरासरीने ३८६ धावा केल्या होत्या. ‘राहुल एकदिवसीय आणि कसोटी संघांमध्ये अजूनही भक्कम पाय रोवून आहे. या प्रकारात निवड समितीचा त्याच्यावर विश्वास आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तो संघाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचं निवड समितीला वाटतं,’ असं या सूत्राने राहुलविषयी बोलताना सांगितलं. (India vs SL)

(हेही वाचा- Telangana पोलिसांकडून Nashik मध्ये गांजातस्करी प्रकरणी महिला नेत्याला अटक)

महत्त्वाचं म्हणजे श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीरही (Gautam Gambhir) प्रशिक्षक म्हणून सूत्र हातात घेईल. २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. (India vs SL)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.