कोलकात्यामध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेच्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही रोहित शर्मा १७ तर शुभमन गिल २१ धावांवर बाद झाला.
( हेही वाचा : मुंबई महापालिकेत ४२१ साह्यकारी परिचारिकांची भरती: सोमवारपासून अर्ज स्वीकारणार)
टीम इंडियाने जिंकली मालिका
विराट कोहली सुद्धा लवकर बाद झाल्याने टीम इंडियाची स्थिती फारशी चांगली नव्हती त्यानंतर लोकेश राहूलने संघासाठी चांगली खेळी करत हार्दिक पंड्या सोबत चांगली भागिदारी केली. परंतु हार्दिक पंड्या ३६ धावांवर बाद झाल्याने ही जोडी फुटली. राहुलने १०३ बॉल्समध्ये ६४ रन्सची खेळी केली. यावेळी त्याने ६ चौकार मारले.
मिशन वर्ल्डकप
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, कुलदिप यादवने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत. तर उमरान मलिकने २ आणि अक्षर पटेलने १ विकेट घेतली आहे. ही मालिका जिंकत भारताने मिशन वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होत असल्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतासाठी प्रत्येक सिरीज महत्त्वाची ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community