गुरूवारी कोलकात्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता BCCI आणि रोहित शर्माने वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे.
( हेही वाचा : माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ! पोलिसात गुन्हा दाखल )
वर्ल्डकपमध्ये कोणाला मिळणार संधी ?
वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात महत्त्वपूर्ण बदल केल जाणार आहे. सूर्यकुमार यादवचा प्लेइंगमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत १ शतक आणि अर्धशतक झळकावले होते. त्याच्याशिवाय ईशान किशनला देखील तिसऱ्या वनडेत संधी मिळू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्शदीप आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचाही तिसऱ्या वनडेमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ विशेष तयारी करत आहे. त्यामुळे प्लेयिंग ११ मध्ये कोणाचा समावेश असणार यासाठी आतापासून नियोजन करण्यात येणार आहे.
राहुल द्रविड संघासोबत…
राहुल द्रविड ब्रेकनंतर पुन्हा एकदा भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. तब्येत अचानक बिघाडल्यामुळे त्याने ब्रेक घेतला होता.
Join Our WhatsApp Community