भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौ-यावर आहे. झिम्बाब्वे विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे. पण सोमवारी सुरू असलेल्या तिस-या सामन्यात भारताच्या शुभमन गिलने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले आहे. गिलच्या या शतकी खेळीने भारताला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत करुन दिली आहे.
शतकी खेळी करत शुभमनने रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांचे विक्रम देखील मोडले आहेत. दरम्यान, शुभमन गिलच्या या शतकी खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शुभमन गिलचे शतक
शुभमन गिलने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतले पहिले शतक झळकवताना केवळ 97 चेंडूत 130 धावांची खेळी केली आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने तिस-या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध 8 बाद 289 धावा पटकावल्या आहेत. शुभमन गिलने आपल्या पहिल्याच शतकात भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचा एक तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले आहेत.
A brilliant CENTURY for @ShubmanGill 👏👏
His maiden 💯 in international cricket.
Well played, Shubman 💪💪#ZIMvIND pic.twitter.com/98WG22gpxV
— BCCI (@BCCI) August 22, 2022
रोहित,सचिनचे विक्रम मोडले
झिम्बाब्वेत सर्वात कमी वयात शतक पटकावण्याचा मान शुभमन गिलने मिळवला आहे. याआधी रोहित शर्माने 23 वर्ष 28 दिवसांचा असताना झिम्बाब्वेत शतक झळकावले होते. शुभमन गिलने 22 वर्ष 348 दिवसांचा असताना हा पराक्रम करत रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. हरारे येथे भारतीय फलांदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही शुभमनने मोडला आहे.
सचिनने 2001 मध्ये हरारेत 122 धावांची खेळी केली होती. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच विक्रमही शुभमन गिलने मोडला आहे. सचिनने 1998 साली झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 127 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता शुभमन गिलने 130 धावा करत हा विक्रम मोडला आहे.
Join Our WhatsApp Community