India Win Asian Champions Trophy : चीनवर १-० ने मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकला आशियाई चॅम्पियन्स करंडक 

India Win Asian Champions Trophy : जुगराजचा एकमेव गोल मोलाचा ठरला

70
India Win Asian Champions Trophy : चीनवर १-० ने मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकला आशियाई चॅम्पियन्स करंडक 
India Win Asian Champions Trophy : चीनवर १-० ने मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकला आशियाई चॅम्पियन्स करंडक 
  • ऋजुता लुकतुके 

आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत चीनचा १-० ने पराभव करत सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. एरवी हा सामना चुरशीचा झाला आणि गोल करण्यासाठी दोन्ही संघांना झुंजावं लागलं. पण, तरीही सामन्यावर भारतातच वर्चस्व होतं. आणि चेंडूचा ताबाही बहुतेक वेळ भारताकडे होता. सामन्यात एकमेव गोल झाला तो ५१ व्या मिनिटाला. जुगराजने हा गोल करत कोंडी फोडली. आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताने पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. (India Win Asian Champions Trophy)

 हा सामना म्हणजे भारतीय आक्रमण आणि चिनी बचाव फळी यांच्यातील द्वंद्व होतं. भक्कम बचावामुळे भारतासाठी संधी निर्माण करणंही कठीण जात होतं. त्यामुळे पहिले तीन क्वार्टर प्रयत्न करूनही गोल झाला नाही. शेवटी जुगराजने मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. खरंतर स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात भारताने चीनला ३-० ने धूळ चारली होती. कर्णधार हरमनप्रीतने तेव्हा दोन गोल केले होते. पण, अंतिम फेरीत वेगळा चिनी संघ बघायला मिळाला. आघाडीच्या फळीला तर चिनी बचावपटूंनी कायम वेढलेलं होतं. (India Win Asian Champions Trophy)

(हेही वाचा- One Nation One Election कधी लागू करणार ?; अमित शाह यांनी सांगितला कालावधी)

चिनी संघासाठी मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही दुसरीच वेळ होती. यापूर्वी २००६ मध्ये चिनी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण, तिथे कोरियाने त्यांचा पराभव केला होता. यावेळी घरच्या मैदानावर खेळताना चीनने पूर्ण प्रयत्न केले.  (India Win Asian Champions Trophy)

 खरंतर अंतिम फेरीत भारताने सुरुवात आक्रमक केली होती. राजकुमार पाल (Rajkumar Pal) आणि सुखजीत सिंग (Sukhjit Singh) यांनी चिनी गोलजाळयावर सातत्याने हल्ले केले. त्यामुळे भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाले. पण, त्यावर गोल होऊ शकला नाही. तर भारतालाही चीनने दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्रास दिला. पण, कृष्णा पाठकनेही भक्कम बचाव करत चीनचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर ५१ व्या मिनिटाला हरमनप्रीतने रचलेल्या चालीवर जुगराजने गोल केला. (India Win Asian Champions Trophy)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.