-
ऋजुता लुकतुके
आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि चीन हे संघ आमने सामने आले होते. चीनने उपान्त्य फेरीत पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताने त्यांचा १-० ने पराभव करत चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली. पण, अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंची एक कृती सगळ्यांचा रोष ओढवून गेली. पाकचे खेळाडू सामन्याला तर हजर होतेच. त्यांनी भारताविरुद्घ चीनच्या संघाला पाठिंबा दर्शवत त्यांचे झेंडेही फडकावले. (India Win Asian Champions Trophy)
(हेही वाचा- India Win Asian Champions Trophy : चीनवर १-० ने मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकला आशियाई चॅम्पियन्स करंडक )
खेळाडूंनी चिनी बॅज लावले होते. गालावरही चीनचा झेंडा टॅटू केला होता. या कृतीमुळे भारतात अर्थातच याविषयी राग व्यक्त होत आहे. (India Win Asian Champions Trophy)
Pakistan Hockey Team Players Hold China Flag and supporting During Asian Champions Trophy Final Against India.#IndianHockey pic.twitter.com/aLaqw886GB
— Sohail Imran (@sohailimrangeo) September 17, 2024
– Pakistan lost to China yesterday
– Pakistan supported China today
Result :
Pakistan saw India winning the trophy and heard the National anthem of India #AsianChampionsTrophypic.twitter.com/B6wnNB8GrR
— Ash (@Ashsay_) September 17, 2024
**Pakistan supporting China in hockey**
Winner India to Pak : #AsianChampionsTrophy2024 #INDvCHN pic.twitter.com/WpyHx2vzqh
— UmdarTamker (@UmdarTamker) September 17, 2024
विशेष म्हणजे पाकिस्तान संघाला चीनकडूनच उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. तरीही पाक खेळाडू चीनला पाठिंबा देत असल्याचं बघून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताने अंतिम सामन्यात चीनचा १-० ने पराभव करत आशियाई चॅम्पियन्स करंडक जिंकला. जुगराजने ५१ व्या मिनिटाला केलेला गोल मोलाचा ठरला. यानंतर हॉकी इंडियाने भारतीय संघाला या विजेतेपदासाठी बक्षीस जाहीर केलं आहे. प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येकाला दीड लाख रुपये देण्यात येणार आहेत. (India Win Asian Champions Trophy)
India’s Asian Champions Trophy heroes rewarded! 🏆🇮🇳
The victorious Indian Men’s Hockey Team gets a well-deserved bonus for their record 5th title win! Each player will receive ₹3 lakhs, while support staff members will be awarded ₹1.5 lakhs each.
This well-deserved reward… pic.twitter.com/cvI8avkpvx
— Hockey India (@TheHockeyIndia) September 17, 2024
चीनने एखाद्या मोठ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची ही फक्त दुसरी वेळ होती. पण, यंदा चीनने कामगिरीत सातत्य दाखवलं आहे. उपांत्य सामन्यातही पाकिस्तानचा २-० ने पराभव करताना चीनने आपल्या आक्रमक खेळाची झलक दाखवून दिली होती. दुसरीकडे पाकिस्तानने कोरियाचा ५-२ असा पराभव करत स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. (India Win Asian Champions Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community