- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे टी-२० विश्वचषकाचा सर्वोत्तम खेळाडूंचा अकरा जणांचा संघ निवडला आहे. अंतिम सामन्यात ७६ धावा करून भारतीय डावाला आकार देणारी विराट कोहली मात्र या संघात नाहीए. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी नमवत आपलं दुसरं टी-२० विजेतेपद पटकावलं. विराट कोहलीने या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका पार पाडली. पण, ९ सामन्यांत तो जेमतेम १४८ धावा करू शकला. (India Win T20 World Cup)
अंतिम सामन्यात मात्र त्याने ५९ चेंडूंत ७६ धावा करत भारतीय संघाच्या ७ बाद १७६ धावसंख्येत महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत अपराजित तर राहिलाच. शिवाय त्यांनी मिळवलेले विजयही निर्विवाद आणि मोठे होते. त्याचाच परिणाम म्हणून आयसीसीच्या अंतिम अकरा जणांच्या संघात सहा भारतीय खेळाडू आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंग असे हे सहा खेळाडू आहेत. (India Win T20 World Cup)
A team of superstars 🌟
Unveiling the ICC Men’s #T20WorldCup 2024 Team of the Tournament 👇https://t.co/A0H0dqsPu7 pic.twitter.com/MasajCygXq— ICC (@ICC) June 30, 2024
(हेही वाचा – Dinesh Karthik : दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवीन फलंदाजीचा प्रशिक्षक आणि सल्लागार)
भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेळोवेळी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देताना १५६ च्या स्ट्राईक रेटने २५८ धावा जमवल्या. तर स्पर्धेत १५ बळी मिळवणारा जसप्रीत बुमरा मालिकावीर ठरला. शिवाय षटकामागे ४.१७ धावांची त्याची धावगती ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. (India Win T20 World Cup)
या स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघानेही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांना धूळ चारत पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेची बाद फेरी गाठली. त्यांचेही तीन खेळाडू आयसीसीच्या संघात आहेत. फझलहक फारुकी, रहमनुल्ला गुरबाझ आणि रशिद खान हे ते खेळाडू आहेत. (India Win T20 World Cup)
आयसीसीचा टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ बघूया
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग (सर्व भारतीय), रहमतुल्ला गुरबाझ, रशिद खान, फझलहक फारुकी (सर्व अफगाणिस्तान), मार्कस स्टईनिस (ऑस्ट्रेलिया), निकोलस पुरण (वेस्ट इंडिज) बारावा खेळाडू-एनरिच नॉर्किये (द आफ्रिका) (India Win T20 World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community