India Win T20 World Cup : विराट, रोहित आणि जाडेजाची जागा कोण घेणार?

India Win T20 World Cup : टी-२० विश्वचषकातील विजयानंतर तिघांनी टी-२० मधून निवृत्ती पत्करली आहे.

91
India Win T20 World Cup : विराट, रोहित आणि जाडेजाची जागा कोण घेणार?
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना संपल्यावर एकीकडे जेव्हा जल्लोष सुरू होता तेव्हा विजेतेपदाची मुलाखत टीव्ही वाहिनीला देताना विराट कोहली अभावितपणे बोलून गेला, ‘माझा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता, शेवटचा टी-२० विश्वचषक होता. मला तो जिंकायचा होता.’ या उद्गारांनी माहीत असलेलं जुनं सत्य पुन्हा एकदा समोर आलं. विराट कोहलीचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक असणार असं वाटतच होतं. ते खरं निघालं. कोहलीही म्हणाला ते तर ‘उघड सत्य’ होतं. भारतीय क्रिकेटमधील एक पर्व संपलं असं म्हणेपर्यंत रोहित शर्माने बक्षीस समारंभात तीच घोषणा केली. एक दिवस नंतर रवींद्र जाडेजाने सूरात सूर मिसळला आणि मग चर्चा सुरू झाली या तिघांची जागा कोण भरून काढणार? (India Win T20 World Cup)

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी थोडंफार उत्तरही देऊन टाकलं. ‘संघात स्थित्यंतराची प्रक्रिया आधीपासूनच सुरू झाली आहे. हे काही आमच्यासाठी नवीन नाही.’ आताचा विश्वचषक पाहिला तर संघातून दोन नावं पुरेपूर गुणवत्ता असूनही बाहेर आहेत. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल. यातील शुभमन गिलला तर राखीव रहावं लागलं. निवड समितीने नेमका काय विचार केलाय ठाऊक नाही. पण, यशस्वी जयस्वाल आता नियमितपणे टी-२० मध्ये सलामीला येईल हे उघड आहे. तर संजू सॅमसन निव्वळ फलंदाज म्हणून सलामीला येऊ शकतो. किंवा शुभमन गिल ती भूमिका पार पाडू शकतो. (India Win T20 World Cup)

(हेही वाचा – India Win T20 World Cup : ‘या’ सात खेळाडूंनी मिळवून दिला भारताला टी-२० विश्वचषक)

याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांच्यावरही निवड समितीची नजर असेल. रोहितकडून टी-२० कप्तानी कदाचित हार्दिक पांड्याकडे जाईल. नाहीतर सूर्यकुमार यादवकडे आणि त्यांच्यावर जबाबदारी असेल नवीन खेळाडूंना पाठबळ देण्याची. रवींद्ग जाडेजाची जागा अक्षर पटेलने विश्वचषकादरम्यान भरून काढली आहे. आता त्याच्या जोडीला वॉशिंग्टन सुंदरचाही विचार होतो का ते पाहायचं. मधल्या फळीत शिवम दुबे आणि रिंकू सिंगलाही आपली जागा पक्की करण्याची संधी आहे. (India Win T20 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.