IND vs PAK Asia Cup : भारतीय फलंदाजांसमोर आव्हान पाक तेज त्रिकुटाचं

भारतीय संघ तसं म्हटलं तर एका स्थित्यंतरातून जातोय.

168
IND vs PAK Asia Cup : भारतीय फलंदाजांसमोर आव्हान पाक तेज त्रिकुटाचं
IND vs PAK Asia Cup : भारतीय फलंदाजांसमोर आव्हान पाक तेज त्रिकुटाचं
  • ऋजुता लुकतुके

आशिया चषकातील लढतीत शनिवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने येतील तेव्हा विराट, रोहीत आणि शुभमनचा मुकाबला शाहीन, नासिर आणि रौफ या तेज त्रिकुटाशी असेल. भारतीय संघ तसं म्हटलं तर एका स्थित्यंतरातून जातोय. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीनंतर संघात फलंदाजीच्या क्रम बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्याचवेळी आशिया चषकात भारतीय फलंदाजांना नासिर शाह, शाहीन आफ्रिदी आणि हॅऱिस रौफ या पाकिस्तानी तेज त्रिकुटाचा सामना करायचा आहे. म्हटलं तर भारतीय फलंदाजांसाठी ही एक संधीच असेल. किंवा हा आशिया चषक त्यांची स्पर्धा पाहणारी असेल.

काही झालं तरी प्रेक्षकांना आशिया चषकात भारत-पाक सामन्याची पर्वणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यात कसलेले फलंदाज विरुद्ध तोफखाना गोलंदाज अशी लढत असेल. तसे दोन्ही संघातले खेळाडू एकमेकांशी आधी खेळलेले आहेत. विराट कोहलीने मेलबर्नमध्ये टी-२० विश्वचषकात हॅरिस रौफला मारलेला लॉफ्टचा ड्राईव्ह अजूनही रसिकांच्या लक्षात असेल. तर त्याच सामन्यात शाहीन आफ्रिदीच्या अगदी शेवटच्या क्षणी स्विंग झालेल्या चेंडूवर रोहीत बेमालूम बाद झाला होता, ही गोष्ट रोहीत विसरला नसेल. क्रिकेटमधले हे दोन अविस्मरणीय क्षण होते. आता फक्त पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या या सामन्यात असे क्षण पुन्हा पाहायला मिळू देत हीच क्रिकेट रसिकांची अपेक्षा असणार.

दुर्दैवाने भारत आणि पाकिस्तान या दोन संघांबरोबरच शनिवारच्या सामन्यात पाऊस हा आणखी एक खेळाडू असणार आहे. कारण, कँडीच्या डोंगराळ भागात त्यादिवशी सतत पावसाची रिपरिप असणार आहे. आणि पावसाने खेळखंडोबा करू नये एवढी इच्छाच आपण धरू शकतो. बाकी दोन्ही संघ नक्कीच आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयार आहेत. विराट कोहलीने नुकतीच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ द्यावा लागतो, असं वर्णन या सामन्याचं केलं होतं. त्यामुळे तो आपलं सर्वोत्तम द्यायला तयार आहे. शुभमन गिल हा सध्या फॉर्ममध्ये असलेला सर्वोत्तम भारतीय फलंदाज आहे. तर श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाही त्रिकुटाला साथ देण्यासाठी तयार असतील. एकंदरीत भारताचा भरवसा असेल तो फलंदाजीवर.

आणि दुसरीकडे, पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार असेल ती बाबर आझमवर. आणि त्यांचं मुख्य शस्त्रं असेल तो तेज तोफखाना. आणि वातावरण ढगाळ असेल तर नासिर आणि शाहीनचे चेंडू चांगले उसळतील, त्यांना स्विंगही मिळेल. आणि भारताच्या आघाडीच्या फळीसाठी ते आव्हान उभं करू शकतील. खासकरून तेज गोलंदाजांविरुद्ध ढिसाळ पदलालित्य असलेल्या शुभमनला हे दोघं त्रास देऊ शकतात. मधल्या फळीतील फलंदाजीची समस्या भारताला आहे तशी ती पाकिस्तानलाही आहे. भारतासाठी के एल राहुल अजून संघात सामील झालेला नाही. तोपर्यंत पहिल्या दोन सामन्यांत ईशान किशनला खेळवण्याचा विचार भारतीय संघ करू शकतो. पण, संघाचा नेमका फलंदाजीचा क्रम किंवा कुणाला कुठल्या क्रमांकावर खेळवायचं हे अजून नक्की झालेलं नाही, यातूनच संघासमोरचा प्रश्न आपल्याला कळू शकतो.

(हेही वाचा – Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज)

पाकिस्तान संघासमोरची समस्याही अशीच आहे. बाबर आझम, फखर झमाम आणि इमाम उल हक हे त्यांचे महत्त्वाचे फलंदाज आहेत. पण, बाकी ४ आणि ६ व्या क्रमांकावर कोण खेळणार हा त्यांच्यासमोरचाही प्रश्न आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाक संघ २०१९ पासून फारसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळलेला नाही. भारतीय संघ जिथे ५७ एकदिवसीय सामने खेळलाय तिथे पाक संघ खेळलाय २७. आणि ते सुद्धा अफगाणिस्तान किंवा बांगलादेश विरुद्ध. गोलंदाजीत मात्र पाकिस्तानच्या संघाला झुकतं माप द्यावं लागेल. कारण, नासिर, रौफ आणि शाहीनचं त्रिकुट खरंच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. उलट भारताकडे जसप्रीत बुमरा नुकताच दुखापतीतून सावरतोय. तर प्रसिध कृष्णा आणि शार्दूलकडे पुरेसा अनुभव नाही. फिरकीमध्ये रवी जाडेजाबरोबर अक्षर आणि कुलदीप यांच्यापैकी कुणाला निवडायचं हा आणखी एक प्रश्न भारतासमोर असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.