भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका खेळवली जात आहे. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली असून पहिल्या दिवसाखेर २५५ धावा ४ बाद अशी त्यांची स्थिती आहे. दरम्यान या सामन्यात स्टीव्ह स्मिथला बोल्ड करून पुन्हा एकदा रवींद्र जाडेजाने स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
स्टीव्ह स्मिथला रवींद्र जाडेजाने बाद केल्यावर आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. जाडेजाने स्टीव्ह स्मिथला कसोटी सामन्यात सर्वाधिक त्रिफळाचीत अर्थात बोल्ड केले असून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जाडेजाने स्मिथला सर्वाधिक ४ वेळा बोल्ड केले आहे.
स्टीव्ह स्मिथला सर्वाधिक बोल्ड केलेला गोलंदाज
- जाडेजाने स्मिथला सर्वाधिक ४ वेळा बाद केले आहे.
- रवींद्र जाडेजानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला दोनवेळा बोल्ड केले आहे.
- भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सुद्धा कसोटीमध्ये स्टीव्ह स्मिथला दोनवेळा बोल्ड केले आहे.