बुद्धिबळ म्हटले विश्वनाथ आनंद हेच नाव पिढ्यान पिढ्या ऐकू येत होते, पण आता या क्षेत्रात नव्या नावाचे पदार्पण झाले आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश (D Gukesh) हा विश्वविजेता ठरला आहे. १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान त्याने पटकावला. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचे आव्हान मोडून काढत त्याने इतिहास घडवला.
आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ११व्या डावात गुकेशने (D Gukesh) विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. १२व्या डावात लिरेनने बाजी मारली. अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचे लक्ष होते. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश (D Gukesh) विश्वविजेता होणार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले.
(हेही वाचा Sambhal प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ वकील Vishnu Shankar Jain यांना जीवे मारण्याची धमकी)
गुरूवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश (D Gukesh) हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला.
Join Our WhatsApp Community