भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून घरी जात असताना रुडकीत्या नारसन बॉर्डवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने लगेचचं पेट घेतला. मात्र या अपघातून ऋषभ पंत थोडक्यात बचावला आहे.
( हेही वाचा : महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी)
त्याला दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात
दिल्ली – डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभ पंतच्या गाडीला आग लागली. त्यानंतर उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयामध्ये दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ पंत हा स्वत: कार चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्याने हा अपगात झाल्याची माहिची सूत्रांकडून समोर आली आहे. ऋषभ पंतला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Communityदिल्ली-देहरादून हाईवे पर रुड़की बॉर्डर के पास क्रिकेटर ऋषभ पंत का एक्सीडेंट हुआ। दुर्घटना में उनकी कार में आगल लग गई। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/yrqGQXbiDC
— ANI_HindiNews (@AHindinews) December 30, 2022