टी20 वर्ल्ड कप हरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ‘या’ दौऱ्यावर!

101

टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये भारत पराभूत झाला आणि भारत टी20 वर्ल्ड कप मधून बाहेर पडला. यानंतर भारतीय क्रिकेट संघावर जोरदार टीका होऊ लागली. भारतीय संघात फेरबदल करण्यात येणार अशी चर्चा सुरु झाली. भरती संघ मायदेशी परतण्याच्या तयारीत असतानाच त्यांना निरोप आला. त्यांना पुढील दौऱ्याला जायचे आहे. हा दौरा न्यझीलंड विरुद्धच्या टी२०  मालिकेचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ या दौऱ्यावर रवाना होणार आहे.

येत्या 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड संघात टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर उभय संघात वन डे मालिकाही होणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या असणार आहे. हार्दिकने याआधीही टी20चे  कर्णधारपद भूषवले आहे. पण वर्ल्ड कपमधल्या भारतीय संघाच्या अपयशानंतर हार्दिककडे आता नियमित टी20 कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया 3 टी20 सामने खेळणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वन डे मालिकाही खेळवली जाईल. टी20 नंतर होणाऱ्या वन डे मालिकेसाठी शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन असेल. 25 नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये मालिकेतील पहिला वन डे सामना खेळवण्यात येईल.

(हेही वाचा हात-पाय मोडेपर्यंत मारले तरी पुन्हा ‘आफताब’सोबत गेली आणि…, शरीराचे 35 तुकडे झालेल्या मुलीच्या हत्येची सत्यकथा)

असा असेल भारताचा संघ 

भारताचा टी20 संघ – हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

भारताचा वन डे संघ –  शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप,  शार्दूल ठाकूर, दीपक चहर.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.