Indian Cricket Team : कसोटींत पराभवांपेक्षा विजयांची संख्या अधिक; भारतीय संघाचा प्रवास 

74
Indian Cricket Team : कसोटींत पराभवांपेक्षा विजयांची संख्या अधिक; भारतीय संघाचा प्रवास 
Indian Cricket Team : कसोटींत पराभवांपेक्षा विजयांची संख्या अधिक; भारतीय संघाचा प्रवास 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने नवीन हंगामातील पहिला कसोटी सामना जिंकला तर रोहित शर्माचा (Rohit Sharma) संघ एक नवीन इतिहास रचेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संघ पराभवांपेक्षा विजयांची संख्या जास्त अशा स्थितीत पोहोचेल. म्हणजेच संघाची यशाची टक्केवारी ही ५० टक्क्यांच्या वर पोहोचेल. भारतीय संघ आतापर्यंत ५७९ कसोटी सामने खेळला आहे. सध्याच्या घडीला भारताने १७८ कसोटी जिंकल्या आहेत. तर तेवढ्याच गमावल्या आहेत. २२२ कसोटी रद्द तरी झाल्यात किंवा अनिर्णित राहिल्या आहेत. (Indian Cricket Team)

(हेही वाचा- Jammu and Kashmir : बारामुला येथे 3 दहशतवादी ठार)

आता पुढची कसोटी जिंकून भारताला नवीन इतिहास रचण्याची संधी आहे. १९५२ साली विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चेन्नईत पहिली कसोटी इंग्लंडविरुद्ध जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघात अनेक बदल झाले आहेत. ‘गलीमें शेर, बाहर ढेर,’ अशी भारतीय संघाची सुरुवातीला संभावना केली जायची. कारण परदेशात कसोटी भारताने जिंकली ती १९६८ मध्ये. परदेशात मालिका जिंकण्यासाठी १९९० चं दशक उजाडावं लागलं. (Indian Cricket Team)

मग परदेशात आणि ते ही इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकण्याची किमया भारतीय संघाने नेमकी कधी आणि कशी केली? (Indian Cricket Team)

(हेही वाचा- रेल्वेमंत्री Ashwini Vaishnav यांनी केला लोकलने प्रवास; म्हणाले, मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करणार)

भारतीय संघाच्या विजयात सातत्य आलं ते १९९०च्या दशकापासून. तेव्हापासूनचे म्हणजे महम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील आकडेवारी बघितली की, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. २००० चं नवीन शतक सुरू झालं तोपर्यंत भारतीय संघाची कामगिरी म्हणजे विजयांपेक्षा पराभव कितीतरी जास्त अशीच होती. (Indian Cricket Team)

राहुल द्रविडने २००७ मध्ये भारतीय संघाला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून दिली. तिथून खऱ्या अर्थाने परदेशात विजयाचं आणि विजयात सातत्याचं वारं सुरू झालं. अझरुद्दिनपासून रोहीतपर्यंत कर्णधारांची कामगिरी आता पाहूया, (Indian Cricket Team)

(हेही वाचा- Mandya (कर्नाटक) येथील गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक; पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित)

मोहम्मद अझहरुद्दीन – ४७ (१४ विजय)

सचिन तेंडुलकर – २५ (४ विजय)

सौरव गांगुली – २८ (११ विजय)

महेंद्र सिंग धोनी – ६० (२७ विजय)

विराट कोहली – ६७ (४० विजय)

रोहित शर्मा – १६ (९ विजय)

या आकडेवारीतून सहज लक्षात येतं की विजयाची मालिका कुठे सुरू झाली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकली. त्यात विराट कोहलीचा फलंदाज म्हणून मोठा वाटा होता. धोनीकडून कोहलीने नेतृत्वाची धुरा हाती घेतली तेव्हा तर चित्रच पालटलं. विराट कप्तान होण्यापूर्वी भारतीय संघ हा फिरकीची महासत्ता मानली जायचा. विराटने प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जोडीने हे चित्र बदललं. भारतीय गोलंदाज परदेशी तेज खेळपट्टीवर चमकायला लागले. भारताने कसोटी जिंकायला सुरुवात केली. त्यामुळेच मागची ८ वर्षं बोर्डर – गावसकर करंडकही भारताकडेच आहे. (Indian Cricket Team)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.