‘अरे ही तर कर्माची फळं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूने शोएब अख्तरची जिरवली

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर मात केली आणि दुस-यांदा जगज्जेते होण्याचा मान पटकावला. या पराभवानंतर पाकिस्तानात शोककळा पसरली असून, पाकचे माजी क्रिकेटपटूही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केलेल्या एका ट्वीटला भारतीय गोलंदाजाने टोमणा मारत पाकिस्तानचा माज उतरवला आहे.

अख्तरचे ट्वीट

इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर शोएब अख्तरने आपल्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्याने आपले मन दुखावले असून हार्ट ब्रेक झाल्याचे इमोजी शेअर केले आहे. अख्तरच्या या ट्वीटला भारताचा वेगवान गोलंदाज महम्मद शमी याने रिट्वीट करत अख्तरची चांगलीच जिरवली आहे.

(हेही वाचाः रेल्वे स्टेशनवरील पिचका-या बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भन्नाट युक्ती)

ही तर कर्माची फळं

सॉरी भावा… याला म्हणतात कर्माची फळं, अशा शब्दांत महम्मद शमीने शोएब अख्तरला टोमणा लगावला आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर शोएब अख्तरने भारतावर टीका केली होती. भारताला इंग्लंडची एकही विकेट काढता आली नसून अंतिम सामन्यात खेळायची भारताची पात्रता नाही, अशी मुक्ताफळे शोएअ अख्तरने उधळली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात भारतायांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. त्यामुळे आता शमीचे हे ट्वीट पाकिस्तान आणि अख्तरला चांगलेच झोंबणारे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here