भारताच्या ‘या’ खेळाडूने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

142

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

( हेही वाचा : Women U19 WC: भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला, अंडर-१९ टी-२० वर्ल्डकप जिंकला)

पोस्ट शेअर करत मुरली विजयची घोषणा 

२००२ ते २०१८ या काळातील माझा टीम इंडियासोबतचा प्रवास खूपच छान होता. मुरली विजयने BCCI, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्जचे सुद्धा आभार मानले आहेत. तसेच या पोस्टमधून त्याने टीम इंडियामधील सर्व सहकारी, कोच, स्टाफ यांनाही धन्यवाद म्हटले आहे.

मुरली विजयने शेवटचा सामना ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये खेळला होता. मुरलीने ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी २० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. येथून पुढे आपण परदेशी लीगमध्ये नशीब आजमवणार असेही त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मुरलीने विजयने ६१ कसोटीत ३ हजार ९८२ धावा, १७ एकदिवसीय सामन्यात ३३९ धावा आणि ९ टी२० सामन्यात १६९ धावा केल्या आहेत. मुरली विजयने कसोटी सामन्यात १२ शतके केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.