ऋजुता लुकतुके
नुकत्याच झालेल्या आशियाई चषकाच्या पात्रता फेरीत भारतीय फुटबॉल संघाचं भवितव्य काय असेल यासाठी मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक यांनी चक्क ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. (Indian Football & Astrologer) यावरून प्रचंड गदारोळ झाला. ज्योतिषाचा सल्ला ही अंधश्रद्धा आहे. असा प्रकार राष्ट्रीय संधाच्या बाबतीत उघड झाल्यामुळे देशभर या प्रकरणाची चर्चा झाली.
असं असताना मुख्य प्रशिक्षक इगॉर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भारताला फुटबॉलप्रेमी देशाचा दर्जा मिळवून देणारच असा निर्धारच त्यांनी आपल्या ट्विटर संदेशातून दिला आहे. त्याचबरोबर भारत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काहीही करू असाच त्यांचा पवित्रा आहे.
(हेही वाचा – Simona Halep Banned : महिला टेनिसपटू सिमोना हालेपवर उत्तेजक चाचणी नियम उल्लंघना प्रकरणी ४ वर्षांची बंदी)
आपल्या ट्विटर संदेशात स्टायमॅक म्हणतात, ‘देशाच्या फुटबॉल विकासासाठी लढणाऱ्या व्यक्तीला तुम्ही लक्ष्य करणार का ? खरंतर फुटबॉलसाठी जे जमेल ते सगळं करण्याची वेळ आता आली आहे. देशातील फुटबॉलची काळजी करणाऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचीही गरज आहे.’ (Indian Football & Astrologer)
Target or honest fighter for the betterment of Indian football?
The time is coming to put all cards on the table and see how much and who really cares about football in this country.
Give it a thought before making up your judgment and thanks once again for your support. pic.twitter.com/SfCaargLlz
— Igor Štimac (@stimac_igor) September 12, 2023
भारतीय फुटबॉलविषयी आपलं मत व्यक्त करण्यापूर्वी फुटबॉलच्या भल्याचा विचार कोण करतो हे आधी लक्षात घ्या, असं थेटपणे स्टायमॅक यांनी म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण ज्योतिषी प्रकरण ?
अलीकडेच भारतीय फुटबॉल संघाविषयी पीटीआयने एक बातमी दिली होती. त्यानुसार, भारतीय फुटबॉल महासंघाने १६ लाख रुपये देऊन संघासाठी एक ज्योतिषी नेमला होता. संघ निवडीपासून इतर अनेक निर्णयांसाठी या ज्योतिषाशी थेट विचार विनिमय केला जात होता. खुद्द प्रशिक्षक स्टायमॅकच या ज्योतिषाशी संपर्क ठेवून होते, असंही या बातमीत म्हटलं होतं.
त्यानंतर भारतात क्रीडाक्षेत्रात ज्योतिषाचा सल्ला घेणं कितपत योग्य आहे यावरून दोन्ही बाजूने चर्चा रंगली. ही अंधश्रद्धा आहे त्यामुळे खेळात आणि राष्ट्रीय स्तरावर असं घडता कामा नये असाच सार्वजनिक सूर होता. शिवाय फुटबॉल संघ आणि संघटनेत नेमकी निर्णय प्रक्रिया काय आहे, त्यात किती पारदर्शकता आहे, नि:ष्पक्षता आहे का, यावरही वाद रंगले.
त्यातच आता स्टायमॅक यांनी अशी थेट भूमिका मांडली आहे. अशावेळी भारतीय फुटबॉलमध्ये पुढे नेमकं काय घडतं याची उत्सुकता सगळ्यांना आता आहे. (Indian Football & Astrologer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community