-
ऋजुता लुकतुके
भारतीय फुटबॉल संघाचे परदेशी प्रशिक्षक इगोर स्टायमॅक (Igor Stimac) अफगाणिस्तान विरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर टीकेचे धनी झाले आहेत. आणि भारतीय फुटबॉल फेडरेशनचा रोषही थोड्याफार प्रमाणात त्यांनी ओढवून घेतला आहे. त्यांची हकालपट्टी करण्याचाच विचार फेडरेशन करत आहे. पण, दोघांमधील करारातील काही कलमांमुळे तसं करता येत नाहीए, अशी बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. (Indian Football News)
शिवाय भारताचे फिफा पात्रता स्पर्धेतील काही सामने अजून बाकी आहेत. येत्या ६ जूनला भारतीय संघ कोलकात्यात कुबेतविरुद्ध खेळणार आहे. अशावेळी अचानक संघ प्रशासनात बदल नकोत, असंही फेडरेशनमधील काही जणांना वाटतंय. ‘प्राप्त परिस्थितीत स्टायमॅकच किमान पुढील दोन महिने भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील,’ असं पीटीआयला फुटबॉल फेडरेशनमधील सूत्रांनी सांगितलं आहे. (Indian Football News)
(हेही वाचा – सांगलीत Sharad Pawar यांची शिवसेना उबाठाच्या खांद्यावर बंदूक?)
भारतीय संघाला आधी कुवेत आणि मग ११ जूनला होणारी कतार विरुद्धची लढत जिंकावीच लागेल. तरंच फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेतील आव्हान कायम राखता येईल. फेडरेशनच्या फुटबॉल तांत्रिक समितीचे अध्यक्ष के विजयन यांनी यापूर्वीच स्टायमॅक यांच्या विरोधात अहवाल दिला आहे. (Indian Football News)
अलीकडेच भारतीय फुटबॉल संघाला क्रमवारीत आपल्यापेक्षा तळाला असलेल्या अफगाणिस्तान संघाकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर सौदी अरेबिया विरोधातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यामुळे भारतीय संघाची कामगिरी अजिबात चांगली झालेली नाही. (Indian Football News)
पण, स्टायमॅक (Igor Stimac) यांच्याबरोबर ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेल्या करारानुसार, त्यांना काढून टाकायचं झाल्यास, तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागेल. आणि ती दिली नाही तर तीन महिन्यांचा पगार त्यांना द्यावा लागेल. सध्या त्यांचा पगार महिना २५ लाख रुपये आहे. त्यामुळे फुटबॉल फेडरेशनसाठी हा निर्णय कठीण आहे. त्यामुळे सध्या तरी इगोर स्टायमॅकच (Igor Stimac) पुढचे काही महिने संघाचे प्रशिक्षक राहतील, अशी शक्यता आहे. (Indian Football News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community