Indian Football Team : भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत ११७ व्या स्थानावर

फिफा क्रमवारीतील भारताची मागच्या १६ वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी आहे. 

178
Indian Football Team : भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत ११७ व्या स्थानावर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत आणखी घसरण झाली असून ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय संघ (Indian team) १५ स्थानांनी घसरून ११७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अलीकडेच झालेल्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारताने सलग तीन सामने गमावले आणि त्यानंतर ही पिछेहाट झाली आहे. २००७ च्या जानेवारी महिन्यात भारतीय संघ (Indian team) १२९ व्या क्रमांकापर्यंत घसरला होता. त्यानंतरची ही सगळ्यात वाईट कामगिरी आहे. (Indian Football Team)

तर २००५ मध्ये क्रमवारीत भारतीय संघ चक्क १७३ व्या क्रमांकावर होता. एएफसी चषकात भारतीय संघ ब गटात तळाला राहिला. संघाला ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान आणि सीरिया संघांकडून पराभव पत्करावे लागले. आणि भारताविरोधात ६ गोल झाले. त्याचा फटका भारतीय संघाला (Indian team) बसला आहे. (Indian Football Team)

(हेही वाचा – Badminton Asia Championship : भारतीय पुरुषांचा चीनकडून २-३ ने पराभव )

जॉर्डनचा संघ ७० व्या क्रमांकावर

नवीन क्रमवारीत आशियाई संघांनी चांगली मुसंडी मारली आहे. कतारमध्ये झालेली एएफसी चषक स्पर्धा यजमान देशानेच जिंकली. आणि या विजयाबरोबरच त्यांनी फिफा क्रमवारीत २१ स्थानांची झेप घेऊन ते ३७व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर याच स्पर्धेतील उपविजेता जॉर्डनचा संघ ७० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Indian Football Team)

आशिया खंडात जपानने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. आणि त्यांचा सध्याचा क्रमांक आहे १८ वा. पण, यात एका क्रमांकाची घट झाली आहे. लायनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ अजूनही अव्वल आहे. आणि त्यानंतर फ्रान्स, इंग्लंड, बेल्जिअम आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो. पहिल्या दहा संघात यंदा कुठलाही बदल झालेला नाही. (Indian Football Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.