Indian Football Team : भारतातील सगळ्यात श्रीमंत, यशस्वी फुटबॉल संघ कुठला?

Indian Football Team : भारतीय फुटबॉलचा इतिहास आणि काही नावाजलेले क्लब 

91
Indian Football Team : भारतातील सगळ्यात श्रीमंत, यशस्वी फुटबॉल संघ कुठला?
Indian Football Team : भारतातील सगळ्यात श्रीमंत, यशस्वी फुटबॉल संघ कुठला?
  • ऋजुता लुकतुके

भारताच क्रिकेटचं प्रस्थ मोठं असलं तरी फुटबॉलचे चाहते कमी नाहीएत. आणि ते अगदी १९७०, ८० च्या दशकापासून फुटबॉलमध्ये रस घेतात. १९८० च्या दशकात भारतीय संघ ऑलिम्पिकही खेळत होता. खासकरून कोलकाता, केरळ आणि गोवा इथं तर फिफा विश्वचषकानंतरही लाडक्या संघांसाठी मिरवणुका निघतात. १९७६ मध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाने फिफा विश्वचषकाचं थेट प्रक्षेपण भारतात करणार नाही, असं सांगितल्यावर कोलकात्यात रस्त्या रस्त्यांवर मोर्चे निघाले होते. आणि शेवटी कोलकात्याच्या बाबूंना लाडका मॅरादोना चषक उंचवताना दिसला होता. (Indian Football Team)

(हेही वाचा- ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी Anil Deshmukh यांच्यावर फडणवीसांचा दबाव; Shyam Manav यांचे गंभीर आरोप)

कोलकात्यातीलच ईस्ट बंगाल, मॉगमेडन आणि मोहनबागान हे तीन क्लब भारतात नावाजलेले होते. पुढे त्यात गोव्याचा डेम्पो आणि साळघावकर यांचाही समावेश झाला. पण, भारतीय फुटबॉलचं खरं चित्र बदलतंय ते इंडियन सॉकर लीग सुरू झाल्यापासून. या खेळात देशात सुसुत्रता येतेय. आणि अगदी ईशान्य भारतातले कुशल खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी तयार होत आहेत. (Indian Football Team)

एकेकाळी फुटबॉल हा भारताचा राष्ट्रीय खेळ होता हे तुम्हाला माहीत आहे का? 

१८८८ मध्ये देशात संघटित फुटबॉलला सुरुवात झाली. ब्रिटिश सैन्यात एकजूट व्हावी यासाठी फुटबॉल खेळला जायचा. १८८८ मध्येच देशात ड्युरांड चषक खेळवायला सुरुवात झाली. आणि ही स्पर्धा फुटबॉलमध्ये सुरू झालेली जगातील तिसरी संघटित स्पर्धा आहे. त्याचबरोबर कोलकाता एफसी हा जगातील पहिल्या सुरू झालेल्या क्लबपैकी एक आहे. तर मोहन बागान हा जगातला दीर्घकाळ सुरू असलेला एक महत्त्वाचा क्लब आहे. १८८९ मध्ये त्याची स्थापना झाली होती. (Indian Football Team)

(हेही वाचा- India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे )

इंडियन सुपर लीगनंतर आता चित्र बऱ्यापैकी बदललंय. आताचे सर्वोत्तम पाच क्लब बघूया,

मुंबई सिटी एफसी –  २०१४ मध्ये स्थापन झालेला हा क्लब आयएसएलमध्ये एक यशस्वी क्लब आहे. द आयलंडर्स म्हणूनही तो ओळखला जातो. राहुल भेके, फुर्गा लेचेंपा, वालपुइया, मेहताब सिंग आणि विक्रम प्रताप सिंग हे क्लबचे प्रमुख खेळाडू आहेत. वेस्ट कोस्ट ब्रिगेड या नावाने क्लबचा चाहता वर्ग ओळखला जातो. (Indian Football Team)

बंगळुरू एफसी –  बंगळुरू एफसीची स्थापना २०१३ मध्ये झाली. आणि पदार्पणातच त्यांनी आय लीग जिंकली होती. संघाला द ब्लूज या नावानेही ओळखलं जातं. सुनील छेत्री या क्लबकडून खेळतो. त्याच्याबरोबरच गुरप्रीत सिंग संधू, पारस श्रीवास आणि अलेक्झांडर जोवानोविक हे संघातील नावाजलेले खेळाडू आहेत. क्लबचा चाहता वर्ग वेस्ट ब्लॉक ब्लूज् नावाने ओळखला जातो. (Indian Football Team)

(हेही वाचा- India’s Tour of Sri Lanka : भारतीय संघाची मुंबई – कोलंबो – पल्लेकल अशी मजल दरमजल )

एटीके मोहनबागान –  मोहन बागान हा भारतातीलच नाही तर आशियातील एक सगळ्यात जुना फुटबॉल क्लब आहे. सुभाषिश बोस, विशाल केथ, सुमित राठी, अनिरुद्ध थापा आणि अन्वर अली हे संघातील मुख्य खेळाडू आहेत. संघाला मरिनर्स या नावानेही ओळखलं जातं. भारतात देशांतर्गत सुरू असलेल्या ड्युरांड कप, आय लीग या अनेक स्पर्धांमध्ये या क्लबने अव्वल कामगिरी केली आहे. (Indian Football Team)

चेन्नाईन एफसी – चेन्नई शहर हा या क्लबचा बेस आहे. आणि गेल्या ९ वर्षांत एक प्रमुख क्लब म्हणून तो नावारुपाला आला आहे. लेझर सर्कोविक, समिक मित्रा, अंकित मुखर्जी, रायन एडवर्ड्स आणि निन्थोई मिथेई हे संघातील प्रमुख खेळाडू आहेत. मरिना माचन्स असं या संघाचं टोपणनाव आहे. आणि संघाचे दोन फॅनक्लब आहेत. त्यांची नावं आहेत – बी स्टँड ब्लूज आणि सुपरमाचन्स (Indian Football Team)

(हेही वाचा- Murlidhar Mohol On Union Budget : मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही; मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्वागत)

एफसी गोवा – गोव्यातील मडगाव इथून हा क्लब चालतो. ब्रँडन फर्नांडेझ, धीरज सिंग, सॅमसन परेरा, संदेश झिंगल आणि कार्ल मॅखह्यू हे संघातील प्रमुख खेळाडू आहेत. ईस्ट लोअर आर्मी आणि गोवा फॅनक्लब हे संघाचे दोन अधिकृत फॅनक्लब आहेत. द गौरस् असं संघाचं टोपणनाव आहे.  (Indian Football Team)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.