भारताचा गोल्डन बॉय जगातील ‘त्या’ पुरस्काराच्या शर्यतीत…

139

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची 2022 च्या जगातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. त्याच्याशिवाय टेनिस स्टार डेनियल मेदवेदेव, एम्मा रादुकानू, फुटबॉलपटू पेड्री, जलतरणपटू एरियन टिटमस आणि अॅथलीट युलिमार रोजास यांनाही नामांकन मिळालेल्या क्रीडा स्टार्समध्ये स्थान मिळाले आहे. या पुरस्कारासाठी विविध क्रिडाक्षेत्रातील सहा मानाच्या खेळाडूंना नामांकित केलं असून नीरज यातील एक आहे. नीरजने स्वत: याबाबत ट्वीट देखील केलं आहे.

जगभरातील 1300 क्रीडा पत्रकारांच्या पॅनेलद्वारे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अकादमीचे 71 सदस्य त्यानंतर विजेत्याची निवड करण्यासाठी मतदान करतील. अकादमीमध्ये काही महान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, जागतिक विजेते आणि क्रीडा यश मिळविणारे आहेत. गेल्या वर्षी राफेल नदाल, नाओमी ओसाका, बायर्न म्युनिक संघ आणि लुईस हॅमिल्टन हे विजेते होते.

(हेही वाचा – समीर वानखेडेंच्या वाशीतील बारचा परवाना रद्द! कोणी केली कारवाई?)

नीरज चोप्राने टोकियोमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. त्याच्या आधी 2008 मध्ये अभिनव बिंद्राने एअर रायफलमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचला होता. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकले. या लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नीरज चोप्रा हा तिसरा भारतीय खेळाडू आहेत. कुस्तीपटू विनेश फोगट आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना 2019 मध्ये नामांकन मिळाले होते. सचिन तेंडुलकरने लॉरे स्पोर्टिंग मोमेंट अवॉर्ड 2000-2020 जिंकला. हा क्षण 2011 च्या आयसीसी विश्वचषकाचा होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.