-
ऋजुता लुकतुके
टोकयो पाठोपाठ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या कांस्य यशानंतर पुरुषांचा हॉकी संघ आता आशियाई स्तरावर चॅम्पियन्स करंडकासाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही स्पर्धा खेळणार असून त्यासाठी १८ जणांचा संघ जाहीर झाला आहे. ८ ते १७ सप्टेंबर दरम्यान चीनच्या हुलूनबीर इथं आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. पी आर श्रीजेशच्या (PR Sreejesh) निवृत्तीनंतर गोलीची जागा आता कृष्णन पाठकने (Krishan Pathak) घेतली आहे. टोकयो आणि आता पॅरिसमध्येही पाठक संघाचा बदली गोली होता. (Indian Hockey Team)
(हेही वाचा- Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांचा रंगारंग उद्घाटन सोहळा; भाग्यश्री, सुमित भारताचे पथक प्रमुख )
कृष्णनच्या बरोबर सुरज करकेरा या बदली गोलीची निवडही संघात झाली आहे. हार्दिक सिंग, ललित उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग आणि समशेर सिंग या खेळाडूंना ऑलिम्पिकनंतर विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक ऐवजी संघाचं उपकर्णधारपद विवेक सागर प्रसादकडे सोपवण्यात आलं आहे. (Indian Hockey Team)
Indian Men’s team in BACK in action!
After a bronze medal winning performance at the Paris Olympics, 2️⃣0️⃣2️⃣4️⃣
Our Men’s team is geared up to take their next challenge
Men’s Asian Champions Trophy 2024 starts from 8th, September 2024. Hulunbuir City, Inner Mongolia, China.
You… pic.twitter.com/NTAOx3qGYR— Hockey India (@TheHockeyIndia) August 28, 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात फारसे बदल झाले नाहीत. ठरावीक अकरा जणांचा संघच शेवटपर्यंत खेळला. त्यामुळे तेव्हाच्या बदली खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने संधी मिळणार आहे. जुगराज सिंग, अरिजीत सिंग हे खेळाडू संधीचं कसं सोनं करतात याकडे सगळ्यात जास्त लक्ष असेल. हरमनप्रीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला होता. आताही पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी भारताची मदार कर्णधारावरच असेल. (Indian Hockey Team)
पॅरिसमध्ये खेळलेले १८ पैकी १० खेळाडू या स्पर्धेतही कायम आहेत. बाकी नवीन आणि जुन्या खेळाडूंचं मिश्रण साधण्याचा निवड समितीचा प्रयत्न आहे. (Indian Hockey Team)
(हेही वाचा- Passport Portal Shut: पासपोर्ट काढताय तर थांबा! आजपासून 5 दिवस देशभरात पोर्टल राहणार बंद)
आशियाई चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय हॉकी संघ
गोली – कृष्णन पाठक, सुरज करकेरा
बचाव फळी – जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित
फॉरवर्ड्स – अभिषेक, सुखजीत सिंग, अरिजीत सिंग, उत्तम सिंग, गुरजोत सिंग
मधली फळी – राजकुमार पाल, निलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद राहील मौसीन
हेही पहा-
Join Our WhatsApp Community