ऋजुता लुकतुके
मलेशियन ओपन अव्वल सुपर सीरिज स्पर्धेनंतर घरच्या मैदानात इंडियन ओपन स्पर्धा खेळतानाही भारताची अव्वल जोडी (Indian Open Badminton 2024) सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीत पराभव झाला. जागतिक अजिंक्यपद पटकावलेल्या कँग मिन युक आणि सिओ सँग जे या कोरियन जोडीने त्यांचा २१-१५, ११-२१ आणि १८-२१ असा पराभव केला. सलग दुसऱ्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळाल्यामुळे भारतीय जोडीची नक्कीच निराशा झाली.
(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : अयोध्या रामरंगी रंगली; राममंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर पंतप्रधानांची भावूक पोस्ट)
सामना चुरशीचा आणि रंगतदार झाला –
सात्त्विक आणि चिराग यांचा कोरियन जोडीबरोबरचा सामना नेहमीच चुरशीचा पण, (Indian Open Badminton 2024) तितकाच रंगतदार झाला आहे. पण, यावर्षी भारतीय जोडी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि गेल्याच आठवड्यात झालेल्या मलेशियन ओपनसह एकूण ४ स्पर्धांमध्ये त्यांनी कोरियन जोडीला हरवलं होतं. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर सात्त्विक आणि चिरागकडून विजेतपदाचीच आशा होती.
Congratulations Kang/Seo 👏
Well played SatChi, onwards and upwards!#YonexSunriseIndiaOpen2024 #IndiaKaSmashMania#BWFWorldTourSuper750#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/fs3vJRRj8B
— BAI Media (@BAI_Media) January 21, 2024
सात्त्विकसाईराज आणि चिराग यांची ९-७ अशी आघाडी –
अलीकडच्या काही सामन्यांमध्ये भारतीय जोडीने नेटजवळ अधिक आक्रमक खेळ करण्याचं धोरण ठेवलं आहे. त्याचबरोबर खेळाचा वेगही वाढवला आहे. खासकरून चिराग शेट्टी फ्रंटकोर्टवरून जोरदार चढाया करतो. ही रणनीती अंतिम फेरीतील पहिल्या गेममध्ये चांगलीच यशस्वी ठरली. सुरुवातीला सात्त्विकसाईराज आणि चिराग यांनी ९-७ अशी आघाडी घेतली. (Indian Open Badminton 2024) कोर्ट बदलल्यावर ही आघाडी वाढवत १९-१३ अशी नेली. पाठोपाठ हा गेमही त्यांनी २१-१५ असा खिशात टाकला.
(हेही वाचा – Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या २८ जानेवारी पर्यंत सुट्ट्या रद्द)
पण, तोपर्यंत भारतीय जोडीचे डावपेच प्रतिस्पर्ध्यांच्या लक्षात आले असावेत. शिवाय सात्त्विकसाईराजकडून थोड्या चुकाही झाल्या. त्याच्या जोरावर कँग आणि सुओ यांनी दुसरा गेम आरामात जिंकला. २१-११ असा विजय मिळवत (Indian Open Badminton 2024) त्यांनी सामन्यात बरोबरी साधली. आणि तिसऱ्या गेमची सुरुवातही आघाडी घेऊन केली.
कोरियन जोडीने साधली अचूक वेळ –
पण, भारतीय जोडीही हळू हळू सावरली. आणि त्यांनी नेटजवळ पुन्हा एकदा चांगला खेळ करायला सुरुवात केली. चिराग नेटजवळचे इंटरसेप्शन फटके चांगले खेळत होता. तर सात्त्विकसाईराज बेसलाईनवर अप्रतिम (Indian Open Badminton 2024) बचाव करत होता. पण, दुर्देवाने भारतीय जोडीला निर्विवाद आघाडी या गेममध्ये घेता आली नाही. त्यांचा वेळ कोरियन जोडीशी बरोबरी करण्यातच जात होता. आणि कोरियन जोडी कशीबशी का होईना, पण, आघाडी टिकवून होती. अखेर चिरागच्या नेट जवळच्या एका चुकीमुळे त्यांना २०-१८ अशी आघाडी मिळाली. आणि यावेळी कोरियन जोडीने वेळ अचूक साधली. भारतीय जोडीचा २१-१८ असा पराभव करत त्यांनी विजेतेपद पटकावलं. (Indian Open Badminton 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community