टीम इंडियाने पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. यावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळवल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १८६ धावांची खेळी केली. जवळपास तीन वर्षानंतर कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याने १८६ धावांची खेळी केल्यामुळे ही मॅच अनिर्णित होऊन भारताचा विजय झाला. यामुळे विराटला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी संपातून माघार )
एकूण ६३ प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड
विराटला प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्यामुळे त्याने आणखी एका विश्विविक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून १० किंवा १० पेक्षा जास्त वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे अवार्ड मिळवले आहेत. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटचा हा १९ वा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आहे, तर वनडेत त्याने ३८ आणि टी २० मध्ये १५ वेळा हा अवॉर्ड जिंकला आहे. त्यामुळे विराटच्या नावावर एकूण ६३ प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डची नोंद झाली आहे.
विराटने १८६ धावांची खेळी केल्याने भारताला ५७१ धावांपर्यंत मजल मारता आली. २०१९ नंतर कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये २८ वे शतक झळकावले. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी मिळाल्याने विराटने या संधीचा फायदा घेतला.