19 सप्टेंबरपासून आयपीएलचा थरार! प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी

बहुप्रतीक्षित असलेल्या इंडियन प्रिमियर लीगचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून दुबईत खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांदरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी मर्यादित संख्येत प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार असल्याचं आयपीएलच्या आयोजकांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.

प्रत्यक्ष अनुभवता येणार थरार

मे महिन्यात कोविडमुळे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात आले होते. ते आता येत्या रविवारपासून दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे सामने रोमांचक ठरणार असून, पुन्हा एकदा प्रेक्षकांना आयपीएलच्या सामन्यांचा थरार प्रत्यक्ष स्टेडिअममधून पहायला मिळणार आहे.

नियमांचे पालन करुन होणार सामने

युएई सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करुन आणि कोविड प्रोटोकॅाल लक्षात घेऊनच चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने दुबईतील शारजाह आणि अबू धाबी येथील मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत. २०१९ नंतर प्रथमच आयपीएलचे सामने प्रेक्षकांसमोर खेळवले जाणार आहेत. २०२१ च्या लीगचा पहिला हंगाम भारतामध्ये खेळवण्यात आला होता. त्यात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते, त्यामुळे चाहत्यांना मैदानात प्रवेश देण्यात आला नसल्याने, त्यांची निराशा झाली होती.

कुठे मिळणार तिकीट?

नेमक्या किती प्रेक्षकांना आयपीएलसाठी एंट्री देण्यात येणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण स्टेडियमच्या ५० टक्के क्षमतेएवढ्या प्रेक्षकांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. आयपीएलसाठी चाहते १६ सप्टेंबरपासून www.iplt20.comया अधिकृत वेबसाइटवर खरेदी करू शकतात, असे आयपीएलच्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here