ठरले! आयपीलचे उर्वरित सामने दुबईत!

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे सामने अर्ध्यावरच थांबवण्यात आले होते. त्यानंतर आता हा उरलेले सामने हे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने हा मोठा निर्णय घेतला आहे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.

३१ सामने उरले आहेत!

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच आयपीएल २०२० ची संपूर्ण स्पर्धा यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र  संघांतील काही कामगारांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळा! “वीर सावरकर धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ होते!” )

बीसीसीआयचा बैठकीत निर्णय!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज विशेष कार्यकारिणीचे आयोजन केले होते. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे उर्वरीत सामने कधी होणार? याची उत्सुकता होती. अखेर बीसीसीआयने हे सामने यूएईला होणार असल्याचे स्पष्ट केले. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here