Indian Super League : ओडिशा एफसीने वेधलं लक्ष 

भारताच्या देशांतर्गत फुटबॉल लीगमध्ये चार सलग विजय मिळवत ओडिशा संघ आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

188
Indian Super League : ओडिशा एफसीने वेधलं लक्ष 
Indian Super League : ओडिशा एफसीने वेधलं लक्ष 
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या देशांतर्गत फुटबॉल लीगमध्ये चार सलग विजय मिळवत ओडिशा संघ आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Indian Super League)

ओडिशा एफसी हा संघ त्यांच्या नैसर्गिक आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. पण, त्या नादात संघाकडून चुकाही होतात. आणि त्याचा फटकाही त्यांना बसतो. त्यामुळे खेळ चांगला होत असला तरी इंडियन सुपर लीगमध्ये हा संघ यंदा पहिल्या पाचातही नव्हता. पण, या हंगामात ओडिशा एफसीने मागच्या काही सामन्यांमध्ये तुफान खेळ केला आहे. (Indian Super League)

रविवारी कलिंगा स्टेडिअमवर त्यांनी हैद्राबाद एफसीचा ३-० असा पराभव केला आणि आपला फुटबॉल ब्रँड सगळ्यांना दाखवून दिला. (Indian Super League)

रॉय कृष्णाने ३५ व्या मिनिटाला आणि अतिरिक्त वेळेत ९४व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर मोर्ताडाने ४० व्या मिनिटाला एक गोल करत विजयात मोठी भूमिका बजावली. ओडिशा संघाचे आता ९ सामन्यांतून १७ गुण झाले आहेत. आणि लीगमध्ये ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. (Indian Super League)

(हेही वाचा – Terrorist killed: लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह ठार)

सामन्याच्या सुरुवातीपासून ओडिशा एफसी संघाच्या हालचाली चपळ आणि वेगवान होत्या. ३४व्या मिनिटाला आयझॅक व्हॅनलेलफेलाने रचलेल्या चालीवर रॉय कृष्णाने अलगद चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली आणि संघाचा पहिला गोल झाला. एकदा आघाडी घेतल्यावर ओडिशा संघाचं आक्रमण सुरूच राहिलं आणि आणखी चारच मिनिटांनी त्यांनी दुसरा गोल केला. यावेळी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा मोर्ताडाने हा गोल केला. (Indian Super League)

घरच्या मैदानावर ओडिशाच्या खेळाडूंना प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा मिळाला. कलिंगा मैदानावर चार हजारपेक्षा जास्त लोकांनी हा सामना बघायला गर्दी केली होती. ओडिशासाठी गोली अमरिंदर सिंगची कामगिरीही चांगली झाली आणि २५व्या मिनिटाला त्याने एक चांगला प्रयत्न हाणून पाडला. (Indian Super League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.