- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रितिका सचदेव यांनी आपल्या मुलाचं नाव ‘आहान’ ठेवलं आहे. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये त्यांच्या कुटुंबात आहानचं आगमन झालं होतं. रोहितची पत्नी रितिका सचदेवने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नाताळ सणाची थीम असलेला एक फोटो टाकला आहे आणि त्यात या चौकोनी कुटुंबाविषयी तिने माहिती दिली आहे.
मुलाच्या जन्मासाठी रोहितने (Rohit Sharma) काही दिवस सुट्टी घेतली होती आणि पर्थची पहिली कसोटी तो खेळला नाही. पण, कसोटी सुरू असताना चौथ्या दिवशी तो संघाबरोबर दाखल झाला आणि आता ॲडलेड कसोटीत तो खेळणार आहे. रविवारी कॅनबेरा इथं झालेल्या पंतप्रधानांच्या संघाविरुद्धच्या सामन्यात तो खेळला होता.
(हेही वाचा – मॅट्रिमॉनियल वेबसाईटमुळे तरुणी ठरली Love Jihad ची शिकार; राहुल असल्याचे भासवत मोहम्मदने केला तरुणीवर लैगिक अत्याचार)
रितिकाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीत कुटुंबातील चारही सदस्य सांताच्या वेशात आहेत आणि रोहितला ‘रो,’ रितिकाला ‘रिट्झ’, समायरला ‘सॅमी’ तसंच चौथ्या सांताक्लॉजच्या डोक्यावर ‘आहान’ असं लिहिलं आहे. रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आपल्या मुलाच्या जन्माची बातमी सोशल मीडियावरच दिली होती. त्याने चौघांचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकताना, ‘कुटुंब, जिथे आम्ही चौघे आहोत,’ असा मथळा या पोस्टला दिला होता.
मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांतच रोहित (Rohit Sharma) पर्थमध्ये संघात शामील झाला. ही कसोटी मात्र तो खेळू शकला नाही. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून ॲडलेड इथं रंगणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community