- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी पर्थमधून राजधानी कॅनबेरा गाठली. इथे पंतप्रधानांच्या संघाबरोबर त्यांचा दोन दिवसीय प्रदर्शनीय सामनाही होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संसदेत जाऊन पंतप्रधान अँथनी एबिनीज यांची भेट घेतली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सगळ्या खेळाडूंची ओळख एबिनीज यांना करून दिली आणि खेळाडूंमध्ये चांगले हास्यविनोद रंगले. खासकरून जसप्रीत बुमराहची गोलंदाजीची शैली आणि विराटचं पर्थमधील शतक यावरून एबिनीज यांनी दोघांचं कौतुक केलं. (Indian Team Meets Aussie PM)
Australian Prime Minister Anthony Albanese meets the Indian Cricket Team at Parliament House, chatting with Jasprit Bumrah and Virat Kohli. #ausvind #BGT2024@SBSNews pic.twitter.com/iyPJINCR7R
— Naveen Razik (@naveenjrazik) November 28, 2024
(हेही वाचा – INS Arighat वरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)
बुमराह नेमका कधी चेंडू हातातून सोडतो ते कळतंच नाही, असं म्हणत एबिनीज हसले आणि तिथून त्यांनी आपला मोर्चा विराट कोहलीकडे वळवला. ‘तुझं पर्थमधील शतक खूपच छान होतं. ऑस्ट्रेलियन जखमा कमी होत्या की काय, म्हणून तू त्यावर मीठ चोळल्यासारखं ते होतं,’ असं म्हणत पंतप्रधान हसले. कोहलीनेही त्यांना हसून उत्तर दिलं. ‘मी फक्त थोडा मसाला वाढवला,’ असं तो म्हणाला. यावर मोकळेपणाने हसून पंतप्रधान म्हणाले, ‘भारतीय मसाला!’
यानंतर रोहितने त्यांची ओळख रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्याशी करून दिली. एबिनीज यांनी त्यांच्याशीही हस्तांदोलन केलं. (Indian Team Meets Aussie PM)
Indian Cricket team meets Prime Minister of Australia Anthony Albanese, ahead of the friendly match against PM’s XI team at Manuka Oval this week.
( Source: PM Anthony Albanese/ X) pic.twitter.com/NlEX0olOh7
— ANI (@ANI) November 28, 2024
(हेही वाचा – आनंद परांजपे यांचे Jitendra Awhad यांना खुले आव्हान; म्हणाले… )
भारतीय संघ आता कॅनबेरातील मनुका ओव्हल इथं पंतप्रधानांच्या संघाबरोबर दोन दिवसांचा प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. शनिवारी आणि रविवारी होणारा हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येईल. दुसरी ॲडलेड कसोटीही दिवस-रात्र आहे. त्यापूर्वी भारतीय संघानेही संध्याकाळी आणि गुलाबी चेंडूने सराव सुरू केला आहे. त्यादृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज बोलंडशी दोन हात करण्याची संधी मिळेल. (Indian Team Meets Aussie PM)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community