मोहम्मद शमीला दणका; न्यायालयाकडून पत्नी हसीन जहाॅंबाबत मोठा निर्णय

98

भारतीय संघाचा वेगवान आणि स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शमीची पत्नी हसीन जहाॅं गही कायम चर्चेत असते. पती मोहम्मद शमीसोबत असलेल्या वादमुळे हसीन ही गेल्या अनेक वर्षांपासून मुलीला घेऊन वेगळी राहत आहे. हसीन अभिनेत्री आहे. कोलकातातील न्यायालयाने शमी पती- पत्नीबाबत एक निर्णय सुनावला आहे.

न्यायालयाचा मोठा निर्णय

कोलकाताच्या न्यायालयाने सोमवारी शमीला त्याच्या विभक्त राहणा-या पत्नीला दरमहा 1 लाख 30 हजार रुपये खर्चासाठी देण्याचे आदेश दिले आहे. या 1 लाख 30 हजार रुपयांमध्ये हसीनाला 50 हजार रुपये वैयक्तिक खर्चासाठी आहेत. तर उर्वरित 80 हजार रुपये हे मुलीच्या देखभालीसाठी आहेत.

( हेही वाचा: ‘वंदे मातरम्’: कादंबरीतील कविता ‘अशी’ बनली भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ )

शमीच्या पत्नीची मागणी काय?

शमीची पत्नी हसीनने 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये 7 लाख रुपये हे वैयक्तिक खर्च तर मुलाच्या संगोपनासाठी 3 लाख रुपये अशी विभागणी केली होती. हसीनची वकील मृगांका मिस्त्रीने न्यायालयाला विनंती केली होती की, 2021-22 या आर्थिक वर्षात शमीच्या आयकर रिर्टननुसार, वार्षिक उत्पन्न हे 7 कोटींपेक्षा अधिक होते. याच आधारावर 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करण्यात आली होती.

शमीच्या वकीलांचा दावा काय?

न्यायालयात शमीची बाजू वकील सेलिम रहमान यांनी मांडली. हसीन स्वत: माॅडल म्हणून काम करत ठराविक रक्कम मिळवत होती. त्यामुळे पोटगी म्हणून मोठी रक्कम मागणे योग्य नाही. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर शमीने 1 लाख 30 रुपये मासिक पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने सोमवारी घेतला. मात्र, पोटगी आणखी जास्त असती तरी आणखी दिलासा मिळाला असता, असे हसीन म्हणाली. तर शमीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.