Indian Team News : ‘श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाबरोबर नवीन प्रशिक्षक असेल,’ – जय शाह

Indian Team News : बीसीसीआय लवकरच राहुल द्रविडचा उत्तराधिकारी जाहीर करणार आहे.

214
Jay Shah New ICC President ? जय शाह खरंच आयसीसीचे नवीन अध्यक्ष होणार?
  • ऋजुता लुकतुके

आगामी श्रीलंके विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकांची निवड जाहीर करण्यात येईल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे. क्रिकेट अकादमीने काही मुलाखतींनंतर दोन नावं निश्चित केली आहेत. यातील एकाची निवड लवकरच जाहीर करण्यात येईल. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव सध्या सगळीकडे चर्चिलं जात आहे. (Indian Team News)

‘बंगळुरू स्थित क्रिकेट अकादमीने दोघांचं नाव प्रशिक्षक पदासाठी शॉर्टलिस्ट केलं आहे. तर एका निवड समिती सदस्याची नेमणूकही जाहीर व्हायची आहे. येत्या काही दिवसांत ही नावं जाहीर होतील. विश्वचषकानंतर लगेचच झिंबाब्वेचा दौरा आहे. आणि या दौऱ्यात क्रिकेट अकादमीचे मुख्य व्ही व्ही एस लक्ष्मण संघाबरोबर जातील. पण, त्यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यात भारतीय संघ नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच खेळेल,’ असं शाह पीटीआयशी बोलताना म्हणाले. गौतम गंभीर यांच्याबरोबरच माजी डावखुरे सलामीवीर वुर्केरी रमण ही दोन शॉर्टलिस्ट केलेली नावं आहेत असं समजतंय. रमण हे अलीकडे महिला संघाचे प्रशिक्षक होते. (Indian Team News)

(हेही वाचा – India Win T20 World Cup : ‘या’ सात खेळाडूंनी मिळवून दिला भारताला टी-२० विश्वचषक)

टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा हे तीन ज्येष्ठ खेळाडू टी-२० मधून निवृत्त होत आहेत. त्यावरही शाह यांनी भाष्य केलं. ‘हे तीनही खेळाडू भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहेत. तिघांनी भारतीय संघाची सेवा केली आहे. विराटने अंतिम सामन्यात दाखवलेलं धैर्य अचाट आहे. रोहितची फलंदाजी आणि नेतृत्व दोन्ही अनमोल आहे. पण, त्यांची जागा टी-२० मध्ये नवीन खेळाडू घेतील आणि हे स्थित्यंतर आधीच सुरू झालं आहे. भारतीय संघाला ते जड जाणार नाही,’ असं जय शाह म्हणाले. (Indian Team News)

टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संध दुलै महिन्यातच झिंबाब्वेचा दौरा करणार आहे आणि युवा शुभमन गिल या दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या दौऱ्यात शिवम दुबे सोडला तर टी-२० विश्वचषकात सामने खेळलेले इतर सर्व खेळाडू जाणार नाहीत. त्यानंतर होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात मात्र भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरेल. (Indian Team News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.