- प्रतिनिधी
जागतिक खो-खो स्पर्धा जिंकून देशाची मान उंच करणाऱ्या खेळाडूंचा शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खो-खो फेडरेशन अध्यक्ष सुधांशु कुमार मित्तल आणि सरचिटणीस एम. एस. त्यागी उपस्थित होते.
(हेही वाचा – Walkeshwar Banganga : बाणगंगा परिसरातील आरतीला होत आहे विरोध; व्यवस्थापन घेणार पोलीस अधिकाऱ्यांची भेट)
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी शुक्रवारी जागतिक खो-खो स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला सन्मानित केले. त्या म्हणाल्या की, ‘भारताने हा विश्वचषक जिंकला त्यामागे खेळाडूंची मेहनत, शिस्त आणि क्रीडाप्रेम आहे. भारतीय संघाने केवळ विजेतेपद मिळविले नाही तर खो-खो या खेळाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले आहे. सरकार स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन खेळाडू घडविण्यासाठी कटिबध्द आहे’.
(हेही वाचा – Delhi Assembly Election च्या प्रचारासाठी दरपत्रक; ४० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा)
भारतीय संघाच्या खो-खो वर्ल्ड कपमधील विजयाने क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे आणि देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. हे यश केवळ भारताच्या क्रीडा कौशल्याचा उत्सव नाही, तर पारंपरिक खेळांचे जतन आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे, असेही रक्षा खडसे (Raksha Khadse) यावेळी म्हणाल्या. खडसे यांनी प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रयत्नांचेही कौतुक केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community