भारतीय संघाला मिळणार नवे सलामीवीर, रोहित-राहूलचा पत्ता कट?; या ४ खेळाडूंमध्ये चुरस

भारतीय संघाचा टी२० विश्वचषकात पराभव झाल्यानंतर BCCI काही महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचारी संघटनांना मोठे यश; दहिसर प्रकरणात ४ जणांना अटक)

सलामीवीर जोडी कोण असणार? 

टी२० विश्वचषकात भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे भविष्यातील संघबांधणीचा विचार केला तर भारताला चांगल्या सलामीवीर जोडीची आवश्यकता आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यात या सर्व सलामीवीर म्हणून कोण खेळणार याची याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

नव्या खेळाडूंपैकी सलामीवीर म्हणून भारताकडे चार पर्याय उपलब्ध आहेत. ईशान किशनला यात पहिली पसंती मिळण्याची शक्यता आहे. शुभमन गिल, दीपक हुडा, ऋषभ पंत, संजू सॅमसन यापैकी दुसरा सलामीवीर फलंदाज कोण असेल याबाबत आता चर्चा सुरू आहे.

ईशान किशान, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या सर्वांनी टी२० मध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. पण शुभमन गिलने अद्याप टी२० मध्ये पदार्पण केलेले नाही. आता ईशानसोबत सलामीला कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताचा T20 संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here