सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘इथे’ खेळणार शेवटचा सामना

164

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आता महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. यानंतर आता सानिया मिर्झाने वेगळीच घोषणा केली. सानिया मिर्झाने टेनिसमधून निर्वृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणा-या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटची खेळताना दिसणार आहे.

( हेही वाचा: अर्शदीपचा लाजिरवाणा विक्रम; एकाच ओव्हरमध्ये टाकले ‘इतके’ नो बॉल )

मागच्या 20 वर्षांपासून अनेकांसाठी आदर्श असलेल्या सानिया मिर्झाने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीपासूनच सुरु होणा-या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिनपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

सानिया मिर्झाची यशस्वी कारकीर्द

सानिया मिर्झाने आपल्या कारकिर्दीत दुहेरीमध्ये 6 वेळा ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. तसेच, दुहेरीत प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवण्याचा मानही मिळवला होता. महिला एकेरीत तिची सर्वोत्तम रॅंकिंग 27 आहे. यूएस ओपनची चौथी फेरी गाठल्यानंतर 2005 मध्ये सानियाने हे मानांकन मिळवले होते. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत तिने पहिल्यांदा यश मिळवले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.