T20 World Cup : भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू निवृत्ती घेणार? सुनील गावस्करांचे सूचक वक्तव्य

टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान आता संपुष्टात आले असून सेमीफायनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा इंग्लंडने १० विकेट्सनी पराभव केला आहे. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी नाबाद ही कामगिरी केली.

( हेही वाचा : सरकारच्या Digilocker वर आता ‘हेल्थ लॉकर’ सुविधा; कुठेही पाहता येतील आरोग्यविषयक नोंदी)

भारताचा पराभव झाल्यानंतर आता माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून ICC च्या नॉकआऊट मॅचेसमधून पराभूत होत आहे. यामुळे भारतीय संघात महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

आश्विन आणि दिनेश कार्तिक या वरिष्ठ खेळाडूंचा हा शेवटचा टी-२० वर्ल्डकप होता. दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये रोहित आणि विराटने खेळावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. हार्दिक पंड्या निश्चितपणे भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो आणि काही खेळाडू निवृत्त होतील असे सुनील गावस्कर म्हणाले आहेत.

BCCI कधीही निवृत्ती घ्या असे सांगत नाही, निवृत्ती जाहीर करण्याती कोणावरही सक्ती नाही नव्या वर्षात भारतीय संघ खूप कमी टी-२० सामने खेळणार आहे. द्रविड यांनी कोणत्याही खेळाडूच्या निवृत्तीबाबत आता बोलण्याची वेळ नाही संघात चांगले खेळाडू आहेत असे सांगितले आहे.

वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाची उभारणी करणे गरजेचे…

वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ अनेक सामने खेळणार आहे यात जवळपास २५ वनडे खेळण्यात येणार आहेत. भारतातच वनडे वर्ल्ड कप होणार असल्यामुळे भारतीय संघाकडून सर्वाधिक अपेक्षा असणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here