टोकियो ऑलिम्पिक : भारताने खाते उघडले! वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक प्राप्त

सिडनी ऑलिम्पिक २०००मध्ये भारताने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात ब्राँझ पदक मिळवले होते. 

औपचारिकरित्या शुक्रवारी, २३ जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच भारताने पदकाचे खाते उघडले आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने हिने वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. मीराबाई चानूने ही कामगिरी ४९ किलोग्राम वजनी गटातील महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल २०२ किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावले आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये ८७ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलत हे यश मिळवले. तर ४९ किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. सिडनी ऑलिम्पिक २०००मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात ब्राँझ पदक मिळवले होते.

तिरंदाजीतील निराशा भरून निघाली!

४९ किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८१ किलोग्राम वजन उचलले. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलोग्राम वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात तिने ८९ किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ ८७ किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने ९४ किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला. शुक्रवार, २३ जुलै रोजी तिरंदाजीमध्ये भारताची निराशा झाली, मात्र  वेटलिफ्टर मीराबाई चानूने हिने हि निराशा भरून काढली.

(हेही वाचा : टोकियो ऑलिम्पिक : शनिवार भारतीय खेळाडूंसाठी ठरणार पदकांचा दिवस!)

क्लिन अँड जर्कमध्ये ११५ किलो उचलत पटकावले सुवर्ण पदक

त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत ११० किलो वजन उचलले, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलले, पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात ११७ किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर चीनच्या जजिहुने क्लीन अँड जर्कमध्ये ११६ किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here