भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आशा उंचावल्या!

184

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील ‘करो या मरो’ सामन्यात बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली असून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे.

( हेही वाचा : आता दोन वर्षात व्हा डॉक्टर! )

या सामन्यात भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 7 विकेट गमावत 229 धावा केल्या. यानंतर बांगलादेशचा डाव 40.3 षटकांत 119 धावांत आटोपला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि शेफाली यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकात 74 धावा केल्या.

यास्तिका भाटिया सामनावीर

230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने 35 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. बांगलादेशचा संघ 40.3 षटकांत 119 धावांत गारद झाला. भारताकडून स्नेह राणाने 4, झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी 2 आणि राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवने 1-1 बळी घेतला. यास्तिका भाटियाला ही या सामन्याची सामनावीर ठरली.

उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल

हॅमिल्टन येथे झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकला आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघाला उरलेला एक सामनाही जिंकावा लागणार आहे. अंतिम सामना भारताने जिंकल्यास संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.