India’s Bid to Host Olympics : भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी केला अधिकृत अर्ज

India’s Bid to Host Olympics : पहिला टप्पा म्हणून आयोजनाची तयारी असल्याचा अर्ज करावा लागतो. 

70
Mission Olympic 2036 : भारताच्या ऑलिम्पिक आयोजन मोहिमेच्या केंद्रस्थानी आग्र्याचा ताजमहल?
  • ऋजुता लुकतुके

भारताची ऑलिम्पिक आयोजनाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. आता २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताने अधिकृतपणे अर्ज केल्याचं समजतंय. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आंतरराष्ट्रीय संघटनेला पत्र लिहून आयोजनाची तयारी असल्याचं म्हटलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं याविषयीची बातमी दिली आहे. (India’s Bid to Host Olympics)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी अनेकदा जाहीरपणे ऑलिम्पिक आयोजनाची इच्छा बोलून दाखवली आहे. पॅरिसमधून परतलेल्या खेळाडूंशी चर्चा करतानाही त्यांनी ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न बोलून दाखवलं होतं. खेळाडूंकडून त्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती. ‘ऑलिम्पिक आयोजनामुळे देशाला विकासाच्याही अनेक नवीन संधी मिळतील. सामाजिक विकास साध्य होईल आणि युवा सक्षमीकरणही होईल, असं पंतप्रधानांना वाटतं. त्यामुळे त्यांनी ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न पाहिलं आहे आणि त्यादृष्टीने निर्णायक पहिलं पाऊलही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने उचललं आहे,’ असं सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. (India’s Bid to Host Olympics)

(हेही वाचा – Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप)

पहिली पायरी म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आपली आयोजनाची इच्छा एका ई-मेलमधून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला कळवली आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं १४० वं वार्षिक संमेलन मुंबईत झालं होतं. तिथेच भारताने पहिल्यांदा आपली आयोजनाची इच्छा आंतरराष्ट्रीय समितीकडे व्यक्त केली. तेव्हाच समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी भारताचा आयोजनाचा दावा नक्कीच मजबूत असेल आणि त्याचा विचार करावा लागेल असं म्हटलं होतं. (India’s Bid to Host Olympics)

अर्थात, भारताबरोबरच आणखी १० देशांनी आयोजनाची प्राथमिक तयारी दर्शवली आहे. मेक्सिको (मेक्सिको सिटी), इंडोनेशिया (नुसांतरा), टर्की (इस्तंबूल), भारत (अहमदाबाद), पोलंड (वर्सॉ), ईजिप्त आणि दक्षिण कोरिया (इंचन) या देशांनीही आयोजनाची तयारी दर्शवली आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नेमलेली एक विशेष समिती घेत असते आणि ही प्रक्रिया किमान वर्षभर चालते. (India’s Bid to Host Olympics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.