Border – Gavaskar Trophy 2024 : बोर्डर – गावसकर चषकातून भारताला मिळालेले क्रिकेटमधील हिरे

Border - Gavaskar Trophy 2024 : सचिन, विराट यांची कारकीर्दही या मालिकेनंतरच खुलली आहे.

42
Border - Gavaskar Trophy 2024 : बोर्डर - गावसकर चषकातून भारताला मिळालेले क्रिकेटमधील हिरे
Border - Gavaskar Trophy 2024 : बोर्डर - गावसकर चषकातून भारताला मिळालेले क्रिकेटमधील हिरे
  • ऋजुता लुकतुके

१९९६ पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही क्रिकेट मालिका सुरू झाली. आणि त्याला बोर्डर – गावसकर चषक (Border – Gavaskar Trophy 2024) असं नाव देण्याचं ठरलं. तेव्हापासून ही मालिका अगदी ॲशेसच्या तोडीची किंबहुना त्याहीपेक्षा जास्त स्पर्धेची झाली आहे. २०१० पासून तर भारतीय संघाने या मालिकेवर वर्चस्वच गाजवलं आहे. भारतासाठी या मालिकेचं महत्त्व इतकंच नाहीए. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतीय क्रिकेटला काही अनमोल हिरे मिळाले आहेत. आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यानंतर गाजवलं आहे. अशा १९९० पासूनच्या दशकातील मालिका आणि त्यातून तयार झालेले खेळाडू पाहूया,

सचिन तेंडुलकर व जवागल श्रीनाथ (१९९१-९२) – तेव्हा या मालिकेचं अधिकृत नामकरण झालेलं नव्हतं. पण, ५ कसोटींची ही मालिका म्हणजे सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. उगवता खेळाडू ही त्याची ओळख तेव्हा होतीच. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असलेला खेळाडू अशी ओळख बनली ती या मालिकेतून. भारतीय संघाने ती मालिका ०-४ अशी गमावली. पण, सचिनने सिडनी कसोटीत केलेल्या नाबाद १४८ धावा पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर केलेल्या ११४ धावा यांची दखल जगाने घेतली. या मालिकेत सचिनने ३६८ धावा केल्या.

दुसरीकडे जवागल श्रीनाथ, कपिल देव आणि मनोज प्रभाकर यांच्या छायेत असला तरी भारतीय संघात तो या मालिकेतूनच स्थिर झाला. ५ कसोटींत ५५ धावांच्या सरासरीने त्याने १० बळी मिळवले. पण, भारतीय डावांत गोलंदाजीची सुरुवात श्रीनाथ करणार हे समीकरण या मालिकेपासून तयार झालं, जे पुढील १० वर्षं टिकलं.

(हेही वाचा – Dombivliतील उबाठा गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश)

व्ही.व्ही.एस लक्ष्मण (१९९९) – लक्ष्मणला व्हेरी व्हेरी स्पेशल हे बिरुद ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतच मिळालं. आणि १९९९ मध्ये त्याने ते सार्थ ठरवलं. सिडनीमध्ये १९८ चेंडूंत केलेली १६८ धावांची खेळी विलक्षण होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत त्याने हे शतक ठोकलं होतं. एरवी विसरावी अशी असलेली ही मालिका लक्ष्मणमुळे लक्षात राहिली.

इरफान पठाण व वीरेंद्र सेहवाग (२००३ – ०४) – पठाण आणि सेहवाग तेव्हा १९ वर्षांचे होते. आणि दोघांनी आपापल्या कामगिरीने या मालिकेवर छाप सोडली. इरफानने आपल्या रिव्हर्स स्विंगने स्टिव्ह वॉ आणि ॲडम गिलख्रिस्ट यांची लागोपाठच्या षटकांत दांडी गुल केली. तर सेहवागने मेलबर्नमध्ये २३३ चेंडूंत १९५ धावा केल्या. इतक्या जलद कसोटी फलंदाजीची सवय तेव्हा ऑस्ट्रेलियालाही नव्हती. बेधडक सलामीवीर म्हणून सेहवागने ओळख मिळवली ती इथेच.

इशांत शर्मा (२००७-०८) – हा दौरा इशांत शर्माची (Ishant Sharma) कारकीर्द बदलणारा ठरला. तेव्हा १९ वर्षांचा असलेला इशांत आपल्या चेंडूंना उसळी आणि अचूक दिशा देण्यात यशस्वी ठरला. रिकी पाँटिंगला त्याने वारंवार सतावलं. आणि भारतीय संघात तो या मालिकेपासून स्थिर झाला. आणि भारताला कसोटी जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात)

विराट कोहली (२०११-१२ व २०१३-१४) – पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) एक नवखा फलंदाज होता. आणि पुढच्याच २०१३ च्या दौऱ्यापर्यंत तो जगातील एक आघाडीचा फलंदाज बनला होता. विराटने दोन वर्षांत ही मजल मारली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या या दोन महत्त्वाच्या दौऱ्यांचा मोठा वाटा आहे. पहिल्या मालिकेत भारताला ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. पण, विराटने ॲडलेडमध्ये ११६ धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या आगमनाची ग्वाही दिली. आणि २०१३ च्या दौऱ्यात तर त्याने धमाल उडवून दिली. संघाचं नेतृत्व करताना त्याने ८६ च्या सरासरीने ६९२ धावा लुटल्या. यात ४ शतकं होती.

चेतेश्वर पुजारा (२०१८-१९) – २०१८ मध्येच भारताने ऑस्ट्रेलियात पहिली मालिका जिंकली. आणि त्याचं श्रेय जातं ते चेतेश्वर पुजाराला. मालिकेत त्याने ३ शतकं झळकावली. अख्ख्या मालिकेत मिळून तो १,२५८ चेंडू खेळला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्याने अक्षरश; थकवलं. ७४ धावांच्या सरासरीने त्याने ५२७ धावा केल्या. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली.

(हेही वाचा – माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक)

ऋषभ पंत (२०१८-१९ व २०२०-२१) – ऋषभ पंतचे (Rishabh Pant) हे दोन्ही ऑस्ट्रेलिया दौरे अनेक अर्थांनी यादगार आहेत. २०१८ मध्ये तर तो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात खेळला. यात सिडनी कसोटीत १५९ धावा करत त्याने आपली चमक दाखवून दिली. या दौऱ्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने ३५० धावा केल्या. पुढील २०२० चा दौरा तर ऋषभ पंतचाच (Rishabh Pant) दौरा होता. अजिंक्य रहाणेच्या संघाने या मालिकेत ब्रिस्बेन कसोटी ३२९ धावांचा पाठलाग करत जिंकली. आणि यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद ८९ धावांचा अनमोल वाटा होता. १९८८ नंतर भारताने पहिल्यांदा तेज ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवला. ही मालिकाही भारताने २-१ ने जिंकली.

मोहम्मद सिराज व शुभमन गिल (२०२०-२१) – २०२० चा मालिका विजय भारतीय संघाला युवा खेळाडूंच्या कामगिरीमुळेच शक्य झाला. खासकरून यादगार ठरलेली ब्रिस्बेन कसोटी मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि ऋषभ पंतनेच (Rishabh Pant) भारताला जिंकून दिली. या कसोटीत सिराजने ७३ धावा देत मॅरेथॉन गोलंदाजी करत ५ बळी मिळवले होते. तर शुभमनने सलामीला ९१ धावा केल्या. आणि मग रिषभ पंत (Rishabh Pant) नाबाद ८९ धावा करत संघाला विजयी केलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.