India’s Head Coach : प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सौरव गांगुली?

सौरव गांगुलीने अलीकडेच भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल असं विधान केलं आहे

135
India’s Head Coach : प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सौरव गांगुली?
India’s Head Coach : प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सौरव गांगुली?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा माजी कर्णधार (India’s Head Coach) आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, असं अर्थपूर्ण विधान सोमवारी केलं आहे. इतकंच नाही तर गौतम गंभीरही (Gautam Gambhir) या पदासाठी चांगला उमेदवार आहे, असं म्हटलं आहे. गांगुलीच्या या विधानांमुळे या विषयीचा गोंधळ सध्या वाढला आहे.

सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची मुदत टी-२० विश्वचषकानंतर संपत आहे. आणि बीसीसीआय द्रविडच्या जागी नवीन उमेदवार शोधत आहे. अशावेळी गांगुलीने असा उघडपणे आपली उमेदवारी व्यक्त करणं शिवाय गंभीरही योग्य उमेदवार असल्याचं म्हणणं यामुळे चर्चेला नवीन वाव मिळाला आहे. (India’s Head Coach)

‘मला भारतीय संघाचा प्रशिक्षक (India’s Head Coach) व्हायला आवडेल. आणि त्याचवेळी त्याला (गौतम गंभीर) व्हायचं असेल तर तो ही चांगला उमेदवार आहे,’ असं गांगुलीने कोलकाता इथं मीडियाशी संवाद साधताना बोलून दाखवलं. अगदी २४ तासांपूर्वी गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) आबूधाबीमधील एका खाजगी कार्यक्रमात तो ही प्रशिक्षक पदासाठी उत्सुक असल्याचं उघड केलं होतं. ‘भारतीय संघाचा प्रशिक्षक (India’s Head Coach) होणं ही गौरवाची गोष्ट असेल,’ असं तेव्हा गंभीर म्हणाला होता.

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी आघाडी!)

आता सौरव गांगुलीनेही (Sourav Ganguly) उघडपणे तसंच बोलून दाखवलं आहे. पण, गांगुलीने प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे की नाही, हे सांगण्याचं मात्र टाळलं. गांगुलीने पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाविषयी आपलं मतही व्यक्त केलं. गांगुलीला त्याच्या कर्णधारपदाच्या कालावधीत आयसीसी चषक जिंकता आला नव्हता. पण, आताचा संघ टी-२० विश्वचषकात तशी कामगिरी करू शकतो, असं गांगुलीला वाटतं. शिवाय अंतिम अकरा जणांमध्ये रिषभ पंतला जागा मिळायला हवी असंही त्याला वाटतं.

‘हा भारतीय संघ चांगला आहे. टी-२० विश्वचषकात आपला संघ चांगलीच कामगिरी करेल. संघ प्रशासनाने अंतिम अकरा जणांमध्ये रिषभ पंतला स्थान द्यायला हवं, असं मला वाटतं. कारण, तो चांगला आणि लढवय्या खेळाडू आहे,’ असं मत गांगुलीने व्यक्त केलं. भारतीय संघ टी-२० विश्वचषकात आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ९ जूनला भारताचा मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचंच पारडं जड असेल असं गांगुलीला वाटतंय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.