भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय. वर्ल्ड कप (World Cup 2023) स्पर्धेनंतर भारतीय संघात सध्या बदलाचे वारे वाहात आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन यांचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंग जनरेशन टीम इंडियात दिसेल. त्यातच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच करार आहे.
(हेही वाचा – Lalit Patil : ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्याऱ्यापैकी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या नावाची जोरदार चर्चा)
राष्ट्रीय क्रिकेट अकदमीचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० T20आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून दिसू शकतो. वर्ल्ड कप संपल्यानंतर आठवडाभरातच ही मालिका सुरू होणार आहे. द्रविडचा करार वर्ल्ड कपच्या शेवटी संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे (BCCI)कडे भारताच्या माजी कर्णधाराला पुन्हा अर्ज करण्याची विनंती करण्याचा पर्याय आहे, कारण बोर्डाला नियमानुसार, या पदासाठी पुन्हा अर्ज मागवावे लागतील. त्यामुले आता राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करायचे आहे की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community