भारतातील सर्वोच्च फूटबाॅल स्टेडिअम तुम्ही पाहिलंत का? बघा फोटो

90

नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्टेडियम हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आहे. पण, आता या यादीत एका फुटबॉल स्टेडियमचाही समावेश झाला आहे, केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह येथे भारतातील सर्वोच्च फुटबॉल स्टेडिअम उभारण्यात आले आहे. डोंगरांच्या मधोमध बनवलेले हे सुंदर स्टेडियम लेहच्या स्पिटुकमध्ये आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी लेहमधील स्पिटुक येथे बांधलेल्या या सुंदर फुटबॉल स्टेडियमचे हवाई दृश्य शेअर केले. फुटबॉल स्टेडियम समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर बांधले गेले आहे आणि खेलो इंडिया स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरचा हा एक भाग आहे.

क्रिडा मंत्र्यांनी केले ट्विट

ठाकूर यांनी स्टेडियमचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतातील क्रीडा पायाभूत सुविधा कशा चांगल्या होत आहेत आणि मोठ्या उंचीवर पोहोचल्या आहेत ते ट्विटच्या माध्यमातून सांगितले. स्टेडियमच्या या दृश्य्याने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमांतर्गत लोकांसाठी विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने हा पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत या दुर्गम भागात हे स्टेडियम बांधण्यात आले आहे.

https://twitter.com/Anurag_Office/status/1482272973583437830?s=08

( हेही वाचा: …तर 6 महिन्यांत इम्पिरिकल डाटा जमा केला असता, गोखले इन्टिट्यूटचा दावा! )

लडाखवासियांच्या स्वप्नांना नवे पंख

हे स्टेडियम जवळजवळ पूर्णपणे तयार आहे आणि लवकरच खेळाडू आणि चाहत्यांसाठी खुले केले जाणार आहे. माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजुजू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राज्यात फुटबॉलसाठी सिंथेटिक ट्रॅक आणि अॅस्ट्रोटर्फसह विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी केली होती. स्पिटुकच्या लोकांसाठी आणि व्यावसायिक फुटबॉल खेळाडू बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या मुलांसाठी हे स्टेडियम  स्वप्नापेक्षा कमी नाही. स्टेडियम स्थानिक लोकांसाठी खुले झाल्यानंतर आणि  फुटबॉल सामन्यांचे आयोजन सुरू झाल्यावर, लडाखवासियांच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.