भारताच्या निखतची ऐतिहासिक कामगिरी! जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

भारताची महिला बॉक्सर निखत झरीन हिने IBA च्या महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत (IBA Women’s World Boxing Championship) ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामुळे जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली आहे. तिने थायलंडच्या जुतामास जितपॉंग हिला ५-० ने पराभूत केले.

निखतने जिंकले सुवर्णपदक 

जागतिक बॉक्सिंगचा अंतिम सामना निखतने जिंकल्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल, आणि लेखा सी या जागतिक बॉक्सिंग जिंकलेल्या महिलांच्या यादीत निखतचा समावेश झाला आहे. मात्र या स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनिषा मॉन हिचे आव्हान संपुष्टात आले आहे. इटलीच्या इर्मा टेस्टा हिने मनिषाला सहज पराभूत केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here