- ऋजुता लुकतुके
प्रशिक्षक गौतम गंभीरला नियुक्ती झाल्यापासून वेळ दवडायचा नाहीए. त्यामुळेच त्याने प्रशिक्षक म्हणून आपलं काम श्रीलंकेत पोहोचल्या पोहोचल्या सुरू केलं आहे. भारतीय संघाबरोबरचं पहिलं सराव शिबीर मंगळवारी पार पडलं. बीसीसीआयने लागलीच गंभीरचा सरावातील व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पदभार स्वीकारताना,’ असा मथळा या व्हीडिओला देण्यात आला आहे. बीसीसीआय बरोबरत या मालिकेचं थेट प्रसारण दाखवणाऱ्या क्रीडा वाहिनीनेही भारतीय संघाचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (India’s Tour of Sri Lanka)
(हेही वाचा- India’s Tour of Sri Lanka : भारतीय संघाची मुंबई – कोलंबो – पल्लेकल अशी मजल दरमजल )
यात गंभीर कर्णधार सूर्यकुमार (Suryakumar) आणि उपकर्णधार शुभमन यांच्याबरोबर चर्चा करताना दिसतो. तर संजू सॅमसन (Sanju Samson) बरोबर तो फलंदाजी करतानाही दिसतो. सूर्यकुमारनेही (Suryakumar) फिरकीपटू अक्षरबरोबर वेळ घालवला. पल्लेकल इथं खेळपट्टीकडून फिरकीलाच साथ मिळेल असा अंदाज आहे. तसं दिसलं तर सूर्यकुमार चौथ्या षटकातच अक्षरचा वापर करू शकतो. (India’s Tour of Sri Lanka)
𝗛𝗲𝗮𝗱 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗚𝗮𝘂𝘁𝗮𝗺 𝗚𝗮𝗺𝗯𝗵𝗶𝗿 𝗧𝗮𝗸𝗲𝘀 𝗖𝗵𝗮𝗿𝗴𝗲! 💪#TeamIndia | #SLvIND | @GautamGambhir pic.twitter.com/sbG7VLfXGc
— BCCI (@BCCI) July 23, 2024
𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐃𝐚𝐲 1️⃣ 🏏#SonySportsNetwork #TeamIndia #SLvIND pic.twitter.com/TploJUhTdW
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2024
The new coach is ready 🤩🇮🇳#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia | @GautamGambhir pic.twitter.com/YFESCntXyz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2024
Now watching: #TeamIndia‘s new T20I captain 🇮🇳💙
Go well, Surya Dada 👏#SonySportsNetwork #SLvIND | @surya_14kumar pic.twitter.com/aXSic8Z4PS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2024
या दौऱ्यात निवड समितीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. रोहीतच्या निवृत्तीनंतर टी-२० प्रकारातील कप्तानी हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणूनही शुभमन गिलवर (Shubman) विश्वास दाखवला आहे. निदान टी-२० प्रकारात शुभमन यशस्वी जायसवालबरोबर (Yashasvi Jaiswal) सलामीला येऊ शकतो. (India’s Tour of Sri Lanka)
(हेही वाचा- Murlidhar Mohol On Union Budget : मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही; मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्वागत)
तर रियान पराग (Riyan Parag) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनाही संघात स्थान पक्क करण्याची संधी मिळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरसाठीही (Washington Sundar) ही मोठी संधी असेल. टी-२० सामने २७, २८ आणि ३० जुलैला पल्लेकल इथंच होतील. (India’s Tour of Sri Lanka)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community